Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News पुणे हादरलं! मुलाने बापाला जिवंत जाळलं; कारण काय तर…

रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत मुलाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील दांडेकर पुल परिसरात घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2026 | 11:55 AM
Crime News पुणे हादरलं! मुलाने बापाला जिवंत जाळलं; कारण काय तर…
Follow Us
Close
Follow Us:
  • मुलाने बापाला पेट्रोल टाकून पेटवले
  • दारूच्या व्यसनातून मुलाचे कृत्य
  • पुण्यातील दांडेकर पुल परिसरातील घटना
पुणे : दारूचे व्यसन असलेल्या मुलाने वडिलांशी वादविवाद घातले. दोघांत कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत मुलाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील दांडेकर पुल परिसरात घडला आहे. या घटनेत वडिलांचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

रविंद्र भालेराव (वय ६१, रा. स.नं. १३०, दांडेकर पुल) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर रविंद्र भालेराव (वय २७, रा. दांडेकर पुल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविंद्र भालेराव हे सुतार काम करत होते. त्यांचा मुलगा सागर देखील त्यांच्यासोबतच सुतार काम करत असत. सागर याला दारूचे व्यसन होते. तो सतत दारू प्यायचा. तो अविवाहित आहे. दांडेकर पुल परिसरात कुटूंबासह हे दोघेही राहत होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात (दि. ७ फेब्रुवारी) सायंकाळी सागर दारू पिल्याने त्यांच्यात वादविवाद झाले. वाद कडाक्याचे झाल्यानंतर रागाच्या भरात सागर याने गाडीतील पेट्रोल काढले व वडिलांच्या अंगावर टाकले. पेट्रोल टाकल्यानंतर काडीपेटीने त्यांना पेटवून दिले. पेट्रोलमुळे अचानक भडका उडाला आणि वडिल रविंद्र हे आगीत होरपळले.

नागरिकांनी त्यांच्यावर पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात ते ४५ ते ५० टक्के भाजले गेले. त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी मुलगा सागर याच्यावर खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुभाष महाले हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : सहावीतील विद्यार्थ्यावर चार वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार; पॉक्सोअंतर्गत गुन्हा

संशयाच्या भरात तरुणीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

मुंबईच्या गोवंडी येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेने १९ वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीचे नाव शिफा असे आहे. पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणींसह २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी घडली.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a son set his father on fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डिजीटल क्रांतीकडे एक पाऊल जातोय पुढे…; मात्र सायबर क्राईमचा धोका आजही कायम
1

डिजीटल क्रांतीकडे एक पाऊल जातोय पुढे…; मात्र सायबर क्राईमचा धोका आजही कायम

कर्वेनगरमधील नदीपात्रालगतच्या परिसरात पोलीस चौकी करा; नगरसेवक स्वप्नील दुधाने यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
2

कर्वेनगरमधील नदीपात्रालगतच्या परिसरात पोलीस चौकी करा; नगरसेवक स्वप्नील दुधाने यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Pune Crime: बाप-लेक दारूच्या नशेत; लेकाने पेट्रोल ओतले आणि…;  पुण्याच्या दांडेकर पुलावर धक्कादायक घडलं
3

Pune Crime: बाप-लेक दारूच्या नशेत; लेकाने पेट्रोल ओतले आणि…; पुण्याच्या दांडेकर पुलावर धक्कादायक घडलं

मोठी बातमी! ‘या’ राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्…
4

मोठी बातमी! ‘या’ राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.