त्रिस्तरीय समितीकडून चौकशी
पीडित विध्यार्थी हा सहावीत शिकणारा असून त्याच्याच चार वर्गमित्रांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा सगळा प्रकार सप्टेंबर महिन्यात घडला. हे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र शाळेकडून संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला. उलट पीडित मुलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित मुलाच्या वडिलांनी केला.
शिक्षण मंत्र्यांनी घेतली दखल
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसें यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दादा भुसे म्हणाले की, या संदर्भात मी स्वत: माहिती घेणार आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करेन. शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.
गुन्हा दाखल
पोलिसांनी अल्पवयीन मुलांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता त्रिस्तरीय समितीच्या चौकशीत काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
“तू कोणाशी बोलतोस?” संशयातून वाद वाढला; पतीने उचललं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्…
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविनाथ रामकृष्ण बर्डे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे.
आपल्या मुलींशीही नीट बोलू दिले नाही
मृतक रविनाथ बर्डे यांचा भाऊ अमोल बर्डे (रा. हरीओमनगर, जटवाडा रोड, हर्सूल) यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार राविनाथ बर्डे यांनी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास गुरुगणेशनगर येथील श्री साई लॉजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी शिवानी हिचा रविनाथवर सतत संशय होता. “तू कोणत्या मुलीशी बोलतोस?” असा आरोप करत ती नेहमी भांडण करत असे. यासोबतच तिने त्याला आपल्या मुलाशीही नीट बोलू दिले नाही, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
मोठी बातमी! ‘या’ राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्…
Ans: छत्रपती संभाजीनगरातील एका इंग्रजी शाळेत.
Ans: सर्व विद्यार्थी सहावीच्या वर्गातील आहेत.
Ans: चार अल्पवयीनांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.






