Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar: “कोणीही काय मी आडवा आलो तरी ३५३…”; अजित पवारांकडून भल्या पहाटे अधिकाऱ्यांची शाळा

मान्सूनपूर्व पावसाने आयटी पार्क असलेल्या हिंजवडीची दाणादाण उडवली होती. तसेच अनधिकृत बांधकामामुळे हिंजवडीचा श्वास गुदमरत होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 26, 2025 | 10:28 AM
Ajit Pawar: “कोणीही काय मी आडवा आलो तरी ३५३…”; अजित पवारांकडून भल्या पहाटे अधिकाऱ्यांची शाळा
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: मान्सूनपूर्व पावसाने आयटी पार्क असलेल्या हिंजवडीची दाणादाण उडवली होती. तसेच अनधिकृत बांधकामामुळे हिंजवडीचा श्वास गुदमरत होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, अनधिकृत बांधकामे हटवण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. आज भल्या पहाटेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी मेट्रोची पाहणी केली. तसेच इतर कामांचा देखील आढावा घेतला. अजित पवार हे आपल्या धडाकेबाज कार्यासाठी ओळखले जातात. हिंजवडीत सुरु असणाऱ्या विकास कामाची त्यांनी पाहणी केली अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या.

आज भल्या पहाटेच अजित पवार हिंजवडीत दाखल झाले. यावेळी त्यांनी मेट्रो कामाची देखील पाहणी केली. दरम्यान अजित पवारांनी पहाटेच अधिकाऱ्यांची शाळा घेतल्याचे पाहायला मिळाले. आपल्या कामाच्यामध्ये कोणी आले तर त्याच्यावर ३५३ दाखल करा. आपले असं ठरले आहे कि कोणीही मध्ये आले तरी त्याच्यावर ३५३ दाखल करायचा. अजित पवार जरी मध्ये आला तरी त्याच्यावर ३५३ दाखल करा. ३५३ लावल्याशिवाय हे होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण माझं हे करा माझं ते करा असं सुरूच राहील. आपल्याला पूर्ण काम करून टाकायचे आहे, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांचे प्रशासनाला स्पष्ट आदेश

मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंजवडी परिसरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पावसाचे मोजमाप, पाण्याचा प्रवाह, बुजवलेले ओढे आणि अनधिकृत बांधकामांबाबत सर्वेक्षण सुरू केले आहे. ओढ्यांवर बांधलेल्या इमारती पाडण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Ajit Pawar: हिंजवडीत पुन्हा पूर येऊ नये म्ह्णून ओढ्यावर बांधलेल्या…”; अजित पवारांचे प्रशासनाला स्पष्ट आदेश

हिंजवडीत सरासरी किती पाऊस पडतो? किती पाणी साचते आणि वाहते? कोणते ओढे बुजवले गेले आहेत? ओढ्यांवर किती आणि कोणत्या प्रकारच्या अनधिकृत इमारती उभारल्या गेल्या आहेत? ओढ्यांवरील इमारती पाडण्याचे आदेश पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, ओढ्यांवर बांधलेल्या अनधिकृत इमारती हटवाव्यात. इमारती खूप मोठ्या असतील आणि त्यांचे स्थलांतर तातडीने शक्य नसेल, तर त्यामधून पर्यायी मार्गाने ओढ्यांना नदीपर्यंत प्रवाहित करण्याची योजना आखावी, असे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.

पवारांनी केली अधिरकुत बांधकामाची पाहणी

आज भल्या पहाटेच अजित पवार यांनी हिंजवडीतील अनधिकृत बांधकामाची पाहणी केली आहे. हिंजवडीतील अधिरकुत बांधकाम पाडण्याचे आदेश अजित पवारांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम पडल्यास वाहुतक कोंडीचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.

Web Title: Ajit awar visit hinjewadi it park metro project and illegal construction pcmc pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 10:16 AM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणार? चव्हाणांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
1

Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणार? चव्हाणांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर; रूपाली पाटलांची ‘या’ पदावर नियुक्ती
2

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर; रूपाली पाटलांची ‘या’ पदावर नियुक्ती

Anjali Damania : सरकारी जमीन खाऊनही FIR मध्ये नाव नाही; पार्थ पवारांवर अंजली दमानियांचा चढला पारा
3

Anjali Damania : सरकारी जमीन खाऊनही FIR मध्ये नाव नाही; पार्थ पवारांवर अंजली दमानियांचा चढला पारा

Ajit Pawar : अजित पवारांचा बहुजनवाद, विकासावर भर; नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ३९ सभा घेत प्रचाराचा झंझावात
4

Ajit Pawar : अजित पवारांचा बहुजनवाद, विकासावर भर; नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ३९ सभा घेत प्रचाराचा झंझावात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.