Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Doval: ‘स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे’; अजित डोवाल यांचा Gen-Z तरुणांना कानमंत्र; ‘स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घ्या’

Ajit Doval: पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी Gen-Z तरुणांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा संदेश दिला. देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करत त्यांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचेही सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 01, 2026 | 04:58 PM
'स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे'; अजित डोवाल यांचा Gen-Z तरुणांना कानमंत्र; 'स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घ्या'

'स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे'; अजित डोवाल यांचा Gen-Z तरुणांना कानमंत्र; 'स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घ्या'

Follow Us
Follow Us:
  • ‘स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे’
  • अजित डोवाल यांचा Gen-Z तरुणांना राष्ट्रहिताचा संदेश
  • लोकमान्य टिळक पुरस्कारानंतर अजित डोवाल यांचे युवांना आवाहन
Ajit Doval News Marathi: पुण्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, पारंपरिक पुणेरी पगडी, धनादेश आणि ‘गीतारहस्य’ ग्रंथाची प्रत देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात अजित डोवाल यांनी विशेषतः Gen-Z तरुणांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचे आवाहन केले.

‘स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नाही’

अजित डोवाल म्हणाले की, “आजच्या पिढीने स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे मनमानी किंवा काहीही करण्याचा अधिकार असा त्याचा अर्थ नाही. राष्ट्रहिताच्या विरोधात जाणारा कोणताही मार्ग स्वीकारता कामा नये.” त्यांनी प्रत्येक नागरिकाने देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत भारताला अधिक सक्षम आणि शक्तिशाली बनविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

Ajit Doval Lokmanya Tilak Award Pune: अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार; अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात गौरव

मोदी-शहा यांच्या नेतृत्वाचे कौतुक

डोवाल यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. ते म्हणाले की, भारताला सध्या मजबूत नेतृत्व लाभले आहे. देश अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारच्या सुरक्षाविषयक आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहे. भारताची वाढती प्रगती काही विरोधी शक्तींना खटकत असून अशा काळात प्रत्येक नागरिकाने राष्ट्रहितालाच सर्वोच्च स्थान दिले पाहिजे.

लोकमान्य टिळकांच्या विचारांतून प्रेरणा घ्या

भाषणादरम्यान अजित डोवाल यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. शिक्षणाच्या काळात पुण्यातच लोकमान्य टिळकांचे विचार जवळून समजल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ब्रिटिश सत्तेच्या काळात लोक भीतीमुळे गप्प राहत असताना लोकमान्य टिळकांनी निर्भीडपणे आवाज उठवला. तुरुंगवास भोगूनही त्यांनी समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचा मार्ग सोडला नाही.

तरुणांना राष्ट्रनिर्माणाचे आवाहन

अजित डोवाल यांनी देशातील तरुणांना लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांचे संघर्ष आणि राष्ट्रभक्तीचा आदर्श समोर ठेवून भारताच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, सक्षम, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी प्रत्येक युवकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

Amit Shah Pune Visit: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेस कार्यकर्त्यांना धरपकड

Web Title: Ajit doval message to gen z on freedom and national interest after lokmanya tilak award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Ajit Doval
  • Gen Z
  • india

संबंधित बातम्या

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?
1

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?
2

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा
3

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

Relationship Tips: आंघोळीशिवाय डेटवर जात आहेत Gen Z! काय आहे नवा Unpolished Look ट्रेंड, का होतोय व्हायरल?
4

Relationship Tips: आंघोळीशिवाय डेटवर जात आहेत Gen Z! काय आहे नवा Unpolished Look ट्रेंड, का होतोय व्हायरल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.