Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?

India Pakistan 1991 Agreement: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी तणाव कमी करण्यासाठी, तसेच गैरसमज दूर करण्यासाठी आणि सीमेवर अपघाती संघर्ष टाळण्यासाठी विश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनांअंतर्गत (CBMs) हा करार करण्यात आला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 17, 2026 | 04:27 PM
India Pakistan 1991 Agreement, Article 10 India Pakistan

India Pakistan 1991 Agreement, Article 10 India Pakistan

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाने भारतीय नौदलाच्या जहाजाला दिलेली धडक उघड
  • भारत-पाकिस्तान ६ एप्रिल १९९१ च्या लष्करी कराराचे पाकिस्तानकडून थेट उल्लंघन
  • कराराच्या ‘कलम १०’ नुसार समुद्रात दोन्ही जहाजांमध्ये ३ सागरी मैलांचे अंतर ठेवणे बंधनकारक
India Pakistan 1991 Agreement Article 10: मागील काही महिन्यांपासून पाकिस्तान सातत्याने चुकीच्या कारवाया करताना दिसत आहे. जमीन, आकाश आणि आता समुद्रातही पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कारवाया भारताच्या संयमाची सतत परीक्षा घेत आहे. पाकिस्तानी नौदलाच्या एका जहाजाने सीमा ओलांडून भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिल्याचा प्रकार काल उघडकीस आला. यावरून दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. पण असे करून पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड पाडून घेतल्याचे बोलले जात आहे. नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने संबंधित पाकिस्तानी उच्चायुक्तालया यासंदर्भात माहिती दिली. भारताचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी, पाकिस्तानने ३५ वर्षे जुन्या कराराचे उल्लंघन केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात एप्रिल १९९१ मध्ये एक करार झाला होता. अलीकडील घटनांमुळे या कराराच्या कलम १० चे थेट उल्लंघन करण्यात आले आहे. हा १९९१ चा करार लष्करी कवायती, युद्धाभ्यास आणि लष्करी हालचालींविषयी आगाऊ माहिती देण्याशी संबंधित आहे. पूर्वी, दोन्ही देशांनी सागरी घटनांच्या संदर्भात या कराराच्या कलम १० चा हवाला दिला आहे.

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

तो करार कोणता आहे?

एप्रिल १९९१ च्या भारत-पाकिस्तान लष्करी कवायती, युद्धाभ्यास आणि सैन्य हालचालींच्या आगाऊ सूचनेवरील कराराच्या कलम १० नुसार, आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात कार्यरत असताना कोणताही अपघात टाळण्यासाठी दोन्ही देशांच्या नौदलाच्या जहाजांनी आणि पाणबुड्यांनी एकमेकांच्या ३ सागरी मैलांपेक्षा जास्त जवळ येऊ नये, असा करार करण्यात आला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी तणाव कमी करण्यासाठी, तसेच गैरसमज दूर करण्यासाठी आणि सीमेवर अपघाती संघर्ष टाळण्यासाठी विश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनांअंतर्गत (CBMs) हा करार करण्यात आला. या करारानुसार दोन्ही देशांना त्यांच्या सीमेजवळ कोणत्याही मोठ्या लष्करी कवायती, सैन्य हालचाली किंवा युद्धाभ्यासापूर्वी एकमेकांना आगाऊ सूचना देणे बंधनकारक आहे. यामुळे सीमा दल सतर्क राहतील आणि याला धोका मानणार नाहीत, हे सुनिश्चित होते.

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL

यावर ६ एप्रिल १९९१ रोजी नवी दिल्ली येथे स्वाक्षरी करण्यात आली. सागरी आणि लष्करी कारवायांदरम्यान गैरसमज, टक्कर किंवा अपघाती घटनांचा धोका कमी करणे हा याचा उद्देश आहे. कलम १० नुसार आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत जहाजे किंवा पाणबुड्यांमधील किमान अंतर किमान ३ सागरी मैल असणे बंधनकारक आहे.

नेमकं काय घडले?

पण मंगळवारी संध्याकाळी अरबी समुद्रात एका भारतीय युद्धनौकेचा सामना अचानक पाकिस्तानी नौदलाच्या एका जहाजाशी झाला. पाकिस्तानने जाणीवपूर्वक धोकादायक आणि अतिवेगाने जहाज वळवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे एक किरकोळ टक्कर झाली. ही घटना आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घडली. कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

भारताने या घटनेवर तीव्र निषेध नोंदवला आहे. पाकिस्तान नौदलाच्या अविवेकी आणि अव्यावसायिक वर्तनाबद्दल तीव्र निषेध नोंदवण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या प्रभारी दूतांना बोलावण्यात आले होते. भारताने पाकिस्तानला आवाहन केले आहे की, त्यांची लष्करी जहाजे समुद्रात असताना त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. याव्यतिरिक्त, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोन्ही देशांमधील संबंधित करारांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

 

Web Title: Pakistan violates article 10 of 1991 india pakistan military agreement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • india
  • India pakistan Dispute
  • Indian Navy
  • international news

संबंधित बातम्या

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा
1

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

India Pakistan Naval Clash Arabian Sea: अरबी समुद्रात पाकिस्तानची नापाक कारवाई; भारतीय जहाजाला धडक
2

India Pakistan Naval Clash Arabian Sea: अरबी समुद्रात पाकिस्तानची नापाक कारवाई; भारतीय जहाजाला धडक

SEBI Demat 2.0: भारतीय कर्ज बाजारात डिजिटल क्रांती! ‘डिमॅट 2.0’द्वारे टोकनायझ्ड कॉर्पोरेट बाँड; MSE चा महत्त्वाचा सहभाग
3

SEBI Demat 2.0: भारतीय कर्ज बाजारात डिजिटल क्रांती! ‘डिमॅट 2.0’द्वारे टोकनायझ्ड कॉर्पोरेट बाँड; MSE चा महत्त्वाचा सहभाग

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?
4

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.