अजित पवार गटाचे बड्या नेत्याच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या, पती, सासू, सासऱ्यांवर गुन्हा दाखल
मुळशी तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. वैष्णवी शशांक हगवणे असं त्यांचं नाव असून हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात पती, सासू, सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; 24 तासात आरोपपत्र दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे यांनी मुळशीतील भुकूम येथे शुक्रवारी (१६ मे) दुपारी चारच्या सुमारास घरातील बेडरुमचा दरवाजा बंद केला आणि गळफास घेत आत्महत्या केली. दरवाजा न उघडल्याने वैष्णवी यांच्या पतीने दरवाजा तोडला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. वैष्णवी यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घोषणा केली. ससून रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. वैष्णवी यांच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. आहे. वैष्णवी यांचे वडील आनंद ऊर्फ अनिल कस्पटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंदेला अटक केली आहे.
गजा मारणेच्या टोळीला पोलिसांचा मोठा दणका, ‘त्या’ साथीदाराला ठोकल्या बेड्या; अलिशान गाड्याही जप्त
शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, राजेंद्र तुकाराम हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे, सुशील राजेंद्र हगवणे यांनी हुंड्यासाठी छळ केला. तिच्या मृत्यूस हेच लोक कारणीभूत असल्याचं तक्रारीत त्यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते असून त्यांच्या गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.