पुण्यातून प्रयागराजला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणार (फोटो- istockphoto / टीम नवराष्ट्र)
पुणे: लाेहगाव विमानतळावरून आता प्रयागराजसाठी विमान सेवा सुरु झाली आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीसाठीच ही सेवा असुन, ‘अकासा एअर’ या कंपनीमार्फत दिली जाणार आहे. प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची आरक्षणे पूर्ण झाल्याने अनेक नागरिक विमानांचा पर्याय निवडत आहेत. पुण्यावरून प्रयागराज येथे जाण्यासाठी थेट विमानसेवा नव्हती.
मात्र, आता ‘अकासा एअर’ कंपनीने मंगळवारपासून एक महिना दररोज लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रयागराजसाठी विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, लोहगाव विमानतळावरून थेट प्रयागराजला न जाता पुणे ते दिल्ली आणि त्यानंतर प्रयागराज असा दोन टप्प्यांत प्रवास करावा लागणार आहे.
महाकुंभ हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. देशभरासह परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या आणि भाविकांच्या मागणीनुसार पुणे ते प्रयागराज ही अतिरिक्त विमान उड्डाण सेवा सुरू करीत आहोत, असे अकासा एअरलाइन्सचे मुख्य वाणिज्य अधिकारी प्रवीण अय्यर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कसे आहे वेळापत्रक?
पुणे ते प्रयागराज विमान सकाळी ७.३० वाजता पुण्यातून उड्डाण करेल आणि ९.४५ वाजता दिल्ली येथे पोहोचेल, तर दिल्लीवरून १०.५० वाजता प्रयागराजच्या दिशेने उड्डाण करत १२.१५ मिनिटांनी प्रयागराज विमानतळावर पोहोचेल. परतीसाठी विमान प्रयागराज येथून दुपारी १२:०५ वाजता उड्डाण करेल आणि दुपारी २.२० मिनिटांनी दिल्ली विमानतळावर पोहोचेल. दिल्ली विमानतळावरून दुपारी ३.०० वाजता पुण्याच्या दिशेने उड्डाण करून सायंकाळी ५.१५ वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल.
कुंभमेळ्यासाठी ऑनलाइन ई-पास कसा मिळवायचा?
गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम असलेल्या प्रयागराजमध्ये हा कुंभ मेळा सुरु झाला आहे. महाकुंभ मेळ्यासाठी यूपी सरकारकडून विविध सुविधा पुरवल्या जात आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी ई-पासचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना महाकुंभात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. यूपी सरकारने 6 रंगीत ई-पास जारी केले आहेत. हे पास वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या रंगाचे असतात. रंगीत पासमुळे एखादी व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे ओळखणे सोपे होते. जर तुम्हीही महाकुंभ मेळ्याला जाणार असाल आणि तुम्हाला ई-पास हवा असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
हेही वाचा: MahaKumbh 2025: कुंभमेळ्याला जाण्याचा विचार करताय? ऑनलाइन ई-पास कसा मिळवायचा ते जाणून घ्या
ई-पास ऑनलाइन बुक कसे करावे? ? (How To book E-Pass Online for Mahakumbh 2025)






