Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Pune News: अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी थेट…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मुद्यावरून आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांचे  उपोषण सुरुच आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 14, 2025 | 09:09 PM
Ajit Pawar Pune News: अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी थेट...

Ajit Pawar Pune News: अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी थेट...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यावर असताना शहरात त्यांचा एक कार्यक्रम सुरू होता. मात्र या कार्यक्रमात काहीसा गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच

माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरले आहेत. बच्चू कडू यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मुद्यावरून आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांचे  उपोषण सुरुच आहे.  अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी जवळ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. 16 जूनपासून त्यांनी पाणी देखील त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

पुण्यात नेमके काय घडले?

पुण्यात अजित पवारांचा एक कार्यक्रम सुरू होता. यावेळी आमरावतीच्या शेतकऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी घोषणाबाजी केली. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी अजित पवारांना जाब विचारलं असल्याचे समजते आहे.

 

bacchu kadu : प्रहारचे नेते बच्चू कडू यांचे आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु; नेमकी मागणी तरी काय?

अन्नत्याग आंदोलनाला हर्षवर्धन सपकाळांनी दिला पाठिंबा

प्रहार संघटनेचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू हे सध्या आंदोलन करत आहेत. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले असून आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मुद्यावरून आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांनी मागील पाच दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. बच्चू कडू यांची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी देखील फोन केला होता. यानंतर बच्चू कडू यांना कॉंग्रेस पक्षाचा देखील पाठिंबा मिळाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन माहिती दिली आहे.

बच्चू कडू यांना मिळाली काँग्रेसची ताकद; अन्नत्याग आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी दिला पाठिंबा

प्रहारचे नेते बच्चू कडू यांना विविध संघटना व पक्षांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्य प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांंनी सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांची भूमिका मांडली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिले आहे की, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. कडू यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे वास्तव आहे, शेतकरी आज मोठ्या संकटात आहे, शेतमालाला भाव नाही, राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, सत्ताधा-यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी पूर्णपणे हताश आणि निराश झालेला आहे, अशी भूमिका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली आहे.

Web Title: Amravati farmers protest against ajit pawar pune event about bacchu kadu hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Bacchu Kadu
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
3

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
4

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.