Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई जोरात; अडीच महिन्यांत 820 ठिकाणं अतिक्रमणमुक्त

एकीकडे महापालिका प्रशासन कारवाईचा दावा करत असतानाच, दुसरीकडे नागरिकांनी या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरातील अनेक भागांत केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 23, 2026 | 03:17 PM
पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई जोरात; अडीच महिन्यांत 820 ठिकाणं अतिक्रमणमुक्त

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई जोरात; अडीच महिन्यांत 820 ठिकाणं अतिक्रमणमुक्त

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १ एप्रिल ते २२ जून या अडीच महिन्यांच्या कालावधीत शहरात एकूण ८२० ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे तब्बल १ लाख ४ हजार २७० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मोहिमेतील प्रमुख आकडेवारी :

अनधिकृत बांधकामे : ४५१ (सुमारे १.०४ लाख चौ.मी.)
नाले अतिक्रमण : २३ (सुमारे ८३९ चौ.मी.)
फेरीवाले व पथारीवाले : ३४६ अतिक्रमणे हटवली.

Mira Bhayandar News : महिला व अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांवर महिला आयोग गंभीर; मीरा-भाईंदर पोलिसांना नोटीससदृश निर्देश

क्षेत्रीय कार्यालयांची कामगिरी

शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक २२९ कारवाया करून आघाडी घेतली आहे. तर ‘इ’ (१०३), ‘ड’ (१००), ‘फ’ (९५), ‘ब’ (९४), ‘अ’ (८४), ‘ग’ (६४) आणि ‘ह’ (५१) अशा क्रमाने कारवाया करण्यात आल्या आहेत.

नागरिकांकडून ‘दिखाऊ’ कारवाईवर संताप

एकीकडे महापालिका प्रशासन कारवाईचा दावा करत असतानाच, दुसरीकडे नागरिकांनी या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरातील अनेक भागांत केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मोठा फौजफाटा नेऊन केवळ भिंत किंवा पत्राशेड तोडून कारवाईचा सोपस्कार पूर्ण केला जातो. त्यानंतर पुन्हा तितक्याच आत्मविश्वासाने अनधिकृत बांधकामे पूर्ण केली जातात. तसेच, अनेकदा क्षेत्रीय कार्यालये पोलिसांत तक्रार देऊन स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

अतिक्रमणे नागरी सुरक्षिततेसाठी घातक

याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ आणि नाले हे नागरिकांच्या सोयीसाठी आहेत. त्यावर होणारी अतिक्रमणे नागरी सुरक्षिततेसाठी घातक आहेत. त्यामुळे ही कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने सुरू राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.”

Raigad News : शार्लोट लेक कामावर प्रश्नचिन्ह ! गाळ न काढताच निधी लाटल्याचा आरोप; माथेरानमध्ये ठेकेदारावर कारवाईची मागणी

Web Title: Anti encroachment action begin in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Encroachment Issue
  • Pimpri-Chinchwad News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.