Baramati Crime News:
केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश
बारामती तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी विजय गावडे यांनी खबर दिली आहे. विजय गावडे हे दि. २० ऑगस्ट रोजी रात्रीच्या पाळीसाठी जी.टी.एन. कंपनीत रात्रपाळीवर कामावर गेले होते. शुक्रवारी सकाळी ते बारामती शहरातील तांदुळवाडी येथील घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पत्नी रमा आणि मुलगा विवेक यांना आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर त्यांनी शेजारी राहणारे सुरज भिमराव शिंदे यांना बोलावून घेतले. दोघांनी घराचा दरवाजा तोडुन आत प्रवेश केला.यावेळी एका खोलीत विवेक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत,तर त्याच खोलीतील खिडकीजवळ रमा गावडे झोपलेल्या आढळल्या. त्यांना आवाज देऊन व हलवून पाहिले असता कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यांच्या गळ्यावर काळसर व्रण असल्याचेही दिसून आले.
यावेळी त्यांचे मेहुणे हनुमंत वायसे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रमा गावडे आणि विवेक गावडे यांना तातडीने बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वीच मृत घोषित केले.घटनास`थळी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी भेट दिली. पुढील तपास पोलिस हवालदार सुधीर काळे करीत आहेत. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.






