Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; दुचाकीवरून जाताना वीज कोसळली, तरुण जागीच ठार

उत्रौली कानवडीच्या हद्दीतील परीटमाळ येथे ही दुर्घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक वीज कोसळल्याने शंकर किसन काटेकर (वय २२ रा. वडगाव डाळ ता. भोर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2026 | 02:58 PM
भोर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

भोर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

Follow Us
Close
Follow Us:

भोर : भोर शहर आणि तालुक्याच्या विविध भागात शुक्रवार (दि.२२) दुपारी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या नैसर्गिक आपत्तीत अंगावर वीज पडल्याने एका २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळपासूनच तालुक्यात प्रचंड उष्मा आणि ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीचच्या सुमारास अचानक सुसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पूर्व भागातील पिकांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

वादळामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक भागांत वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. शहरात सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज पाहता नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

वीज कोसळली अन् आयुष्य संपले…

​मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास उत्रौली कानवडीच्या हद्दीतील परीटमाळ येथे ही दुर्घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक वीज कोसळल्याने शंकर किसन काटेकर (वय २२ रा. वडगाव डाळ ता. भोर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर चंद्रकांत गणपत वाघमारे (वय २६) अनिल रवी घोगरेकर (वय २३ दोघे रा. वडगाव डाळ ता.भोर) सागर शांताराम पवार (वय २५) हे तरुण जखमी झाले आहेत. जखमींवर भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, भोर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आंबेगाव तालुक्यातही मुसळधार पाऊस

आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी अर्धा तास सर्वदूर पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा फटका शेती क्षेत्राला बसू लागला आहे. अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे तरकारी पिकांच्या सऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे नव्याने लावलेल्या तसेच वाढीच्या अवस्थेतील रोपांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी शेतातून काढून देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली.

आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका; पिकांमध्ये पाणीच पाणी, शेतकऱ्यांची धावपळ

Web Title: Bhor taluka hit by pre monsoon rains young man dies after being struck by lightning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Lightning Strike

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.