Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाेटनिवडणुकीतील पराभवानंतर कसब्यात भाजपची सावध भूमिका; बालेकिल्ला जिंकण्यासाठी कोणता डाव खेळणार?

भाजपने २८ वर्ष या मतदारसंघात प्रतिनिधीत्व केले आहे .  कसबा पाेटनिवडणुक झाली तेव्हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली हाेती.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 25, 2024 | 02:35 AM
पाेटनिवडणुकीतील पराभवानंतर कसब्यात भाजपची सावध भूमिका; बालेकिल्ला जिंकण्यासाठी कोणता डाव खेळणार?

पाेटनिवडणुकीतील पराभवानंतर कसब्यात भाजपची सावध भूमिका; बालेकिल्ला जिंकण्यासाठी कोणता डाव खेळणार?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  पाेटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपकडून कसब्यातील उमेदवार ठरविताना सावध पावले टाकली जात आहेत. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यास प्रथमच एवढा विलंब झाला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाताे. २०१९ पर्यंत दिवगंत खासदार गिरीष बापट यांनी पाच वेळा या मतदारसंघात विजय मिळविला. बापट यांच्यानंतर मुक्ता टिळक या २०१९ मध्ये या मतदारसंघातून आमदार झाल्या. परंतु प्रदिर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. या ठिकाणी झालेल्या पाेटनिवडणुकीत काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला ढासळल्यानंतर पुणे शहर काॅंग्रेसला आत्मविश्वास मिळाला. यावेळी धंगेकर यांच्यासाेबत ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस असे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते हाेते. ही निवडणूक मतदारांनी हातात घेतल्याचे चित्र त्यावेळी निर्माण झाले हाेते. या पाेटनिवडणुकीत भाजपकडून काही चुका झाल्या, त्यावर वरीष्ठ पातळीवर चर्चाही झाली.

पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर माेहाेळ यांना पंधरा हजाराचे मताधिक्य मिळाले. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह आला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून शहराध्यक्ष धीरज घाटे आणि पाेटनिवडणुकीतील उमेदवार हेमंत रासने यांच्या नावाची चर्चा आहे. यातच ब्राम्हण समाजाला या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. पाेटनिवडणुकीत भाजपने ब्राम्हण उमेदवार न दिल्याचा फटका बसल्याचेही एक पराभवामागील कारण आहे. याचाही विचार सध्या उमेदवारी देण्यासंदर्भात पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा केली जात आहे.

रासनेंचा जनसंपर्कावर भर

पराभव झाल्यानंत रासने यांनी पुन्हा एकदा जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला. त्यांनी विविध पक्षीय पातळीवर आयोजित केल्या जाणारे कार्यक्रम राबविण्यावर भर दिला. तसेच सामाजिक उपक्रम राबवून, वैयक्तीक प्रश्न साेडविण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा: “वडगाव शेरीमधील जनता…”; उमेदवारी जाहीर होताच बापूसाहेब पठारेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

धंगेकरांची आक्रमक प्रतिमा

काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली आहे. ससुन रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेट, हिट अँड रन प्रकरण आदी  प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केले आहे. यामुळे ते सातत्याने चर्चेत राहीले आहेत. याचाही विचार भाजपच्या नेत्यांना करावा लागणार आहे.

तिसरा उमेदवार काेण ?
भाजपने २८ वर्ष या मतदारसंघात प्रतिनिधीत्व केले आहे .  कसबा पाेटनिवडणुक झाली तेव्हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली हाेती. मात्र, त्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत तिसऱ्या उमेदवाराने घेतलेली मते ही निर्णायक ठरली आहेत. याच पद्धतीने भाजपकडून यावेळी व्यूहरचना केली जाणार का ? हा देखील उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

Web Title: Bjp alert mode in kasba constituency after byelection pune maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • Pune

संबंधित बातम्या

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले
1

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला
2

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral
3

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
4

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.