Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: गुगलवर हत्येची माहिती शोधली, कॅफेत कट रचला? केतन अग्रवाल प्रकरणात नवा खुलासा

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला हत्येचे वळण मिळाले आहे. तपासात होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्यावर संशय असून दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सियाच्या मोबाईल तपासात हत्येच्या कटाशी संबंधित काही माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 24, 2026 | 01:27 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सिया आणि चेतनची चौकशी सुरू.
  • लोहगडावर घटना घडण्यापूर्वी कट रचल्याचा पोलिसांचा संशय.
  • मोबाईल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे सुरू.
पुणे: पुणे लोहगड किल्ल्यावरून पडून केतन अग्रवालचा मृत्यू झाला. सुरुवातील हा अपघात असल्याचे समोर आले. मात्र पुणे पोलिसांनी तपास केला असता हा अपघात नसून हत्या असल्याचा थरारक खुलासा करण्यात आला आहे. हा अपघात नसून होणाऱ्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचून हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीय आहे.

सियाने गुगलवर सर्च काय केलं?

केतन अग्रवालच्या हत्येचा कट सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने रचला. लोहगडावरुन ढकलण्याआधी सियाने केतनच्या हत्येचा कट गुगलवर सर्च करुन शिजवला, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिच्या मोबाईलमध्ये त्या अनुषंगाने काही पुरावे आढळले आहेत. गुगलवरुन घेतलेल्या माहितीच्या आधारे केतनची हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय, असं ही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, घटनेला पूर्णत्वास आणण्यापूर्वी चेतन आणि सिया एका कॅफेमध्ये भेटले आणि केतन अग्रवाल याला कसं मारायचं याचा प्लॅन बनवला. लोहगडावर कुठला पॉईंटवरुन केतनला ढकलले जाऊ शकते याचा प्लॅन दोघांनी आखला आणि १८ जून रोजी कटानुसार केतनची हत्या केली.

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी

साप आला साप आला…

4 जूनला लोहगडावर आला नाही, म्हणून कडाक्याचे भांडण केलं होत. १४ जूनला लोहगडावर जाण्याचा सियाने हट्ट धरला. वडिलांनी नाईलाजास्तव परवानगी दिली. ते लोहगडावर गेले. साप आला, साप आला असं नाटक करुन सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्येचा दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला.

केतनला आधीच संशय होता

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, केतनला सियाच्या वागण्याबद्दल आधीपासूनच शंका होती. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यापासून सिया बहुतांश वेळ फोनवर व्यस्त असायची आणि त्यावरून दोघांमध्ये अनेकदा किरकोळ वाद व्हायचे. केतनने कुटुंबाकडे चेतन चौधरी याच्या नावाचा उल्लेखही केला होता आणि सियाच्या चारित्र्याबद्दल पडताळणी करण्याची विनंती केली होती. कौटुंबिक ओळखीचे हे स्थळ असल्याने मी केतनला काळजी न करण्याचा सल्ला दिला आणि त्याचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही,” अशी खंत त्याच्या वडिलांनी व्यक्त केली.

कोण आहे सिया गोयल?

सिया गोयल ही पुण्यातील व्यावसायिक प्रवीण गोयल यांची कन्या आहे. सिया गोयल ही २० वर्षाची असून वाडिया कॉलेजमध्ये बी-कॉम शिक्षण ही घेत आहे. गोयल कुटुंबीयांचा ड्राय फ्रुटस-मसालेचा व्यवसाय आहे. तर सियाला मात्र मार्केटयार्ड परिसरात केक विक्रीची बेकरी टाकून देण्यात आली आहे.

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवालचा मृत्यू कुठे झाला?

    Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचा मृत्यू झाला.

  • Que: या प्रकरणात कोणाची चौकशी सुरू आहे?

    Ans: केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांची चौकशी सुरू आहे.

  • Que: पोलिस तपासात कोणते पुरावे तपासले जात आहेत?

    Ans: पोलिस मोबाईल, सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

Web Title: Pune crime searched for murder details on google hatched a plot in a caf new revelation in the ketan agarwal case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: खराडीत किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला सिलेंडर; महिलेचा जागीच मृत्यू
1

Pune Crime: खराडीत किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला सिलेंडर; महिलेचा जागीच मृत्यू

Ketan Agarwal – Siya प्रकरणासारख्या थरारक कथा! पत्नीच्या छळामुळे उद्ध्वस्त झाले पतीचे आयुष्य; OTT वरील हे ५ चित्रपट नक्की पाहा
2

Ketan Agarwal – Siya प्रकरणासारख्या थरारक कथा! पत्नीच्या छळामुळे उद्ध्वस्त झाले पतीचे आयुष्य; OTT वरील हे ५ चित्रपट नक्की पाहा

Pune Crime news: आधी ५० कोटींची खंडणी, नंतर थेट गोळीबार!  पुण्यात लॉरेन्स बिष्णोई गँगची दहशत?
3

Pune Crime news: आधी ५० कोटींची खंडणी, नंतर थेट गोळीबार! पुण्यात लॉरेन्स बिष्णोई गँगची दहशत?

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी
4

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.