फोटो सौजन्य- प्रतिनिधी
मतदान संपताच पुण्यातील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे, चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकत आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या विजयाचे बॅनर झळकले. भाजप नेते सनी निम्हण यांनी सिद्धार्थ शिरोळे यांच्या विजयाच्या बॅनर लावले आहेत. अखंड विजयाचे कमळ फुलले विधानसभा निवडणुकीतील महाविजयाबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे हे बॅनर आहेत. बॅनरवर सिद्धार्थ शिरोळे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावण्यात आला आहे. पुण्यातील या बॅनरची चर्चा सर्वत्र होत आहे.
एक्सिट पोलचा अंदाज काय ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले असून, यामध्ये महायुतीला आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजीच्या अंदाजानुसार महायुतीला 152 ते 160 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळू शकतात. लहान पक्ष आणि अपक्षांना 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे.
ELECTORAL EDGE ZE च्या एक्झिट पोलनुसार, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीला भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपने सर्वाधिक 148 जागांवर उमेदवार उभे केले असून, त्यापैकी 78 जागा मिळू शकतात. मात्र, 2019 च्या तुलनेत भाजपच्या 27 जागा कमी होत असल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाला 26 जागा, अजित पवार गटाला 14, कॉंग्रेसला 60 राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला 46 आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 44 जागा मिळू शकतात.
मेघ अपडेट्सनेही महायुतीला 150 ते 170 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागांवर समाधान मानावे लागेल. अपक्ष आणि लहान पक्षांना 8 ते 10 जागा मिळतील, असेही नमूद केले आहे.
PMARQ च्या अंदाजानुसार, महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील. इतर पक्ष आणि अपक्षांसाठी 2 ते 8 जागा राखीव राहतील, असा अंदाज आहे.
मॅट्रीज एक्झिट पोलने महायुतीला 150 ते 170 जागांचे प्रचंड बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील, असे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील 288 जागांसाठीच्या या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून जाहीर केला जाणार आहे. नेमके त्यावेळीच महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येईल हे कळू शकते. निकालानंतर अपक्ष उमेदवारांची संख्याही सत्तास्थापनेसाठी महत्वाची ठरु शकते.
Karale Master : कराळे मास्तरांना भाजप कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण; वर्ध्यातील Video व्हायरल
राज्यातील मतदान