Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे खपवून घेतले जाणार नाही; भाजपच्या आमदाराचा दिपकेंना इशारा

आंदोलनाच्या नावाखाली अराजकता माजवणे, निराधार आरोप करणे आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी दिशाभूल करणारी विधाने करणे योग्य नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2026 | 06:41 PM
आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे खपवून घेतले जाणार नाही; भाजपच्या आमदाराचा दिपकेंना इशारा
Follow Us
Follow Us:

पिंपरी-चिंचवड :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी तसेच भारताच्या इतिहासाविषयी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी वस्तुनिष्ठ अभ्यास करणे आवश्यक आहे. आंदोलनाच्या नावाखाली अराजकता माजवणे, निराधार आरोप करणे आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी दिशाभूल करणारी विधाने करणे योग्य नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-सरकार्यवाह अतुल लिमये यांनी सीजेपी (CJP) आंदोलनासंदर्भात भूमिका मांडल्यानंतर अभिजीत दीपके यांनी केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना आमदार गोरखे बोलत होते.

संघाचे शंभर वर्षांचे राष्ट्रकार्य

आमदार अमित गोरखे म्हणाले की, अतुल लिमये यांनी संबंधित आंदोलनाबाबत अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध विवेचन केले. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दीपके यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी संघाने अवमान केल्याचा आणि महात्मा गांधी यांच्या हत्येत संघाचा सहभाग असल्याचा जुना व निराधार आरोप पुन्हा केला. अशा प्रकारची विधाने करण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास, भारताची संस्कृती आणि संघाचे शंभर वर्षांचे राष्ट्रकार्य यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

समाजात संभ्रम निर्माण करणे अयोग्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या शतकभरात भारतीय संस्कृती, सामाजिक समरसता आणि राष्ट्रभावना दृढ करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. संघामधील सरसंघचालकांनंतर सरकार्यवाह आणि अखिल भारतीय सह-सरकार्यवाह ही अत्यंत जबाबदारीची पदे आहेत. अशा जबाबदार पदावरील व्यक्तींनी मांडलेल्या विचारांवर टीका करताना किमान तथ्यांचा आधार असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप झाले होते; मात्र भारतीय न्यायव्यवस्थेने संघाला दोषमुक्त केले. भारतीय संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचा दावा करणाऱ्यांनी हा ऐतिहासिक संदर्भ विसरू नये, असा सवालही आमदार गोरखे यांनी उपस्थित केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघाने अपमान केल्याचा आरोपही वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगत आमदार गोरखे म्हणाले की, इतिहासात महात्मा गांधी यांनी १९३४ मध्ये वर्धा येथील संघ शिबिराला भेट दिली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही संघाच्या शाखेला भेट दिल्याचे १९४० मधील ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत. त्यामुळे इतिहासाचा अपूर्ण किंवा सोयीस्कर अर्थ लावून समाजात संभ्रम निर्माण करणे अयोग्य आहे, असे गोरखे म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार, 22 तोळे सोने लुटून आरोपी पसार; नेमकं काय घडलं?

दिल्लीतील आंदोलनाचा उल्लेख करताना आमदार गोरखे म्हणाले की, त्या आंदोलनात भारतविरोधी घोषणा, भारतीय संस्कृतीचा अवमान करणारी वक्तव्ये आणि देशाच्या नेतृत्वाविषयी अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा वापरण्यात आली. आंदोलन हे लोकशाहीचे माध्यम असले तरी त्यातून देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे किंवा समाजात तेढ निर्माण करणे कदापि स्वीकारार्ह नाही. ‘भारताची सांस्कृतिक परंपरा आणि राष्ट्रीय मूल्यांचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करण्यापूर्वी इतिहास, संविधान, न्यायव्यवस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा सखोल अभ्यास करावा,’ असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी अभिजीत दीपके यांना केले आहे.

Web Title: Bjp mla amit gorkhe has issued a warning to abhijit deepke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • BJP
  • CJP
  • CJP Protest

संबंधित बातम्या

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
1

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
2

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक
3

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.