Pune News: Intense agitation by Buddhist community for 'Mahabodhi Vihar Mukti' in Pune city...
पुणे : बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्या अशी मागणी पुढे येत आहे. बिहार राज्यातील पाटना बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे. ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्या, यासाठी देशभर भन्तेजींच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरु आहेत. आज पुण्यात देखील महाबोधी विहार मुक्तीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच, बौध्द समाज बांधवांनी मोठा मोर्चा काढून महाविहार मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आले. महाबोधी विहार मुक्ती कृती समितीच्या वतीने तसेच समस्त भन्ते यांच्या नेतृत्वात आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
‘बुध्दम शरणम गच्छामी’ अशा सुरात शिवाजीनगर येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकापासून आंदोलानास सुरुवात करण्यात आली. रथात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मुर्ती ठेवून हातात पंचशील ध्वज, अंगात पांढरे वस्त्र परिधान करून महिला व पुरुष आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. महाबोधी विहार मुक्तीसाठी यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा : पुण्यात अश्लील चाळे करणारा मुजोर गौरव आहुजा अखेर शरण येणार? Video करत मागितली माफी
हातात विविध मागण्या असलेले फलक दिसत होते. फलकावर चलो एक साथ, चलो बुद्ध की ओर, महाबोधी विहार मुक्त ब्राह्मण व्यवस्थेतून मुक्त झालेच पाहिजे, बौध्दांना स्वतःचा महाबोधी विहार व्यवस्थापन हक्क मिळलाच पाहिजे, सन १९४९ चा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा रद्द झालाच पाहिजे, बौध्दांना स्वनिर्णयाचा हक्क मिळलाच पाहिजे, महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात दिलेच पाहिजे आशा आशयाचे फलक हाती घेऊन महाबोधी विहार मुक्ती कृती समितीचे पदाधिकारी, आंबेडकरी बौद्ध समाजाकडून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा : Pune Crime News : हवेतील गुन्हा रोखू शकतात तर जमिनीवरील का नाही? सुषमा अंधारेंचा पुणे पोलिसांवर निशाणा
यावेळी महाबोधी विहार मुक्त कृती समितीचे शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, संजय सोनवणे, डाॅ.सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, जयदेव गायकवाड, अविनाश साळवे, वसंत साळवे, भन्ते अनेक मान्यवर, सदस्य सहभागी झाले होते. मोर्चा बालगंधर्व, जंगली महाराज रस्ता, संभाजी पुतळा ते अल्का टाॅकीज चौकापर्यंत गेला. चौकात प्रमुख नेते, भन्ते यांची भाषणे झाली आणि आंदोलनाचा शेवट करण्यात आला.