Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केतन अग्रवालला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

लोहगडावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नसून, तो कट रचून केलेला खून असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. त्याची होणारी पत्नी सिया आणि तिच्या प्रियकर चेतन चौधरीनेच केतनला दरीत ढकलून ठार केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 28, 2026 | 04:26 PM
केतन अग्रवालला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

केतन अग्रवालला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:

पिंपरी : लोहगडावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नसून, तो कट रचून केलेला खून असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. त्याची होणारी पत्नी सिया आणि तिच्या प्रियकर चेतन चौधरीनेच केतनला दरीत ढकलून ठार केले. लग्नाला नकार असल्याने हे हत्याकांड घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. यावरुन आता नागरिक आक्रमक झाले आहेत. केतन अग्रवाल याच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि अग्रवाल कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी शनिवारी लोढा बेल्मोंड सोसायटी परिसरात नागरिकांनी मोठा कॅण्डल मार्च काढला. या मार्चमध्ये सोसायटीतील रहिवाशांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात मेणबत्त्या आणि न्यायाची मागणी करणारे फलक घेऊन नागरिकांनी शांततेत हा मोर्चा काढत केतन अग्रवाल याला श्रद्धांजली अर्पण केली.

 

केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ला परिसरात मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर खुनाचा आरोप असून पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा : ऑपरेशन उबाठा बुडवाचे सूत्रधार संजय राऊतच; खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा घणाघात

कॅण्डल मार्चदरम्यान नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तसेच अग्रवाल कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असेही नागरिकांनी सांगितले. यावेळी उपस्थित नागरिकांनी केतन अग्रवाल याच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. परिसरात शांतता आणि शिस्तीच्या वातावरणात हा कॅण्डल मार्च पार पडला. दरम्यान, या प्रकरणातील तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी या प्रकरणात निष्पक्ष आणि जलद तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Citizens have organized a candlelight march to secure justice for ketan agarwal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.