Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: एकीकडे 1300 टँकरने पाणीपुरवठा तर दुसरीकडे दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

नळातून येणारे पाणी चिखलासारखे, पिवळसर आणि अशुद्ध असल्याने नागरिकांना अंघोळ, धुणी आणि स्वयंपाकात वापर करणेही धोकादायक वाटत आहे. या पाण्यामुळे डेंग्यू, कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो यांसारखे आजार होण्याचा धोका वाढला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 03, 2025 | 08:27 PM
Pune News: एकीकडे 1300 टँकरने पाणीपुरवठा तर दुसरीकडे दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळांमधून गढूळ, कुजलेला आणि वास येणारे पाणी येत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठी वेगळ्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. ठाकूर बेकरी परिसर, संत नामदेव हायस्कूल जवळचा भाग आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठामागील परिसरात ही समस्या अधिक तीव्र आहे.

नळातून येणारे पाणी चिखलासारखे, पिवळसर आणि अशुद्ध असल्याने नागरिकांना अंघोळ, धुणी आणि स्वयंपाकात वापर करणेही धोकादायक वाटत आहे. या पाण्यामुळे डेंग्यू, कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो यांसारखे आजार होण्याचा धोका वाढला आहे.
स्थानिक रहिवासी अतुल मराठे म्हणाले, “सात-आठ दिवसांपासून पाणी इतके खराब येत आहे की ते वापरणे अशक्य आहे. आम्ही ते उकळून, गाळून वापरत आहोत. तुरटी व मेडिक्लोर वापरतो, पण हे तात्पुरते उपाय आहेत.” नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाय झालेले नाहीत. पावसाळ्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त नलिनी सुर्यवंशी यांनी सांगितले, “पाण्याबाबत तक्रारी मिळाल्या आहेत. संबंधित विभागाला तपासणीसाठी सांगितले असून लवकरच दुरुस्ती करून स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल.”

ऐन पावसाळ्यात तब्बल 1,300 टँकरने होतोय पाणीपुरवठा

 मे आणि जून महिन्यांमध्ये समाधानकारक पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटल्याचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात शहरात दररोज सरासरी 1300 टँकर फेऱ्या होत असल्याने महापालिकेचा नियमित पाणीपुरवठा अपुरा ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. धरणांत पाणी असूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू राहणे, हे महापालिकेच्या पाणी व्यवस्थापनातील अपयशाचे लक्षण आहे. समान पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ण होण्याची गरज आहे. अन्यथा पावसाळ्यापर्यंत साठा असूनही उपनगरांतील नागरिकांना टँकरचा खर्च, गैरसोय आणि पाण्याची असुरक्षितता भोगावी लागणार आहे.

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मागणी कमी झाली, तर जूनमध्ये धरण भरले तरीही 39 हजारांहून अधिक टँकरच्या फेऱ्या झाल्या. गेल्या वर्षी याच तारखेला एकूण साठा फक्त 4.35 टीएमसी होता. म्हणजेच यंदा जवळपास चारपट अधिक जलसाठा उपलब्ध आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार धरणांत यंदा लक्षणीय साठा झाला आहे.

Pune Breaking: पुण्यात कोसळधार; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सध्याची स्थिती काय?

समान पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्ण

पुणे महापालिकेच्या वतीने शहरात समान पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. या योजनेतून संपूर्ण शहरात नियमित आणि समान प्रमाणात पाणी मिळावे, हा उद्देश आहे. मात्र या योजनेचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे अनेक उपनगरे व नवविकसित भागांमध्ये नागरिकांना अजूनही टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.

Web Title: Citizens suffer due to contaminated water supply pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • Pune Corporation
  • pune news
  • Pune water supply

संबंधित बातम्या

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
1

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
3

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल
4

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.