Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध; ‘सारथी’च्या कार्याचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

मराठा समाजातील युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सारथी संस्थेच्या कार्याचा गौरव करत विविध योजनांची माहिती दिली.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 26, 2026 | 08:14 PM
युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध; 'सारथी'च्या कार्याचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध; 'सारथी'च्या कार्याचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

Follow Us
Follow Us:
  • सारथीच्या माध्यमातून UPSC मध्ये 140 तर MPSC मध्ये 1,124 विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
  • मराठा विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के शुल्क सवलत, वसतिगृह आणि निर्वाह भत्ता यांसारख्या योजना सुरू.
  • ‘निपुण सेतू’ उपक्रमातून गुणवत्तापूर्ण पण नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी
 

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले असून, या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून झालेले कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार योगेश टिळेकर, विक्रम काकडे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, अभिमन्यू पवार, महापौर मंजुषा नागपुरे, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सारथीचे संचालक मधुकर कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली राजर्षी शाहू महाराजांची जयंती

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारो घेण्यात येणाऱ्या परिक्षेत १४०, महाराष्ट्र लोकसेवा आयोग १ हजार १२४ आणि बँकिंग क्षेत्रात ५०० हून अधिक तरुण-तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणांतून १३ हजारांहून अधिक युवक रोजगारक्षम झाले असून दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे. मराठा समाजातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या तीन पैलूंवर आधारित धोरण राबविण्यात आले.

उच्च शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक शिक्षणासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या शहरात होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी वासतिगृह आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना ६० हजार रुपयापर्यंत आर्थिक सहकार्य करण्यास सुरुवात झाली. उद्योजकता विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ गतिमान करण्यात आले आणि व्याज सवलत सुरू करण्यात आली. या माध्यमातून पाऊणे दोन लाखापेक्षा अधिक उद्योजक तयार झाले असून साडेसात हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी शासन वर्षाला १५०० कोटी देते , असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचविण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाबरोबरच संशोधन, पीएच.डी., कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्य विकसित करण्यासाठी सारथीने प्रभावी काम केले आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे, तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

शेती क्षेत्रातही राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महाविस्तार’ अॅप सुरू केले असून सुमारे ५० लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत मोठे परिवर्तन होणार असून त्यासाठी आवश्यक ड्रोन पायलट प्रशिक्षणही सारथीमार्फत सुरू करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी  सांगितले. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर येथे सारथीची विभागीय केंद्रे, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचे  काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामे पूर्ण होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना सारथीला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे सारथी आज सक्षम संस्थेच्या रूपात उभी राहिली असून त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

एमपीएससी परीक्षा वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेण्यावर शासनाचा भर आहे. परीक्षांमध्ये ऑनलाईन पद्धतीबाबत विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. कोणताही निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेने पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘निपुण सेतू’ उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि  त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च राज्य शासन उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कार्यालये एकत्र आणून विद्यार्थ्यांना आणि युवकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Cm devendra fadnavis sarathi education skill development employment maratha youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Maharashtra Governement

संबंधित बातम्या

बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, तब्बल 36585 कोटींची आर्थिक तरतूद
1

बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, तब्बल 36585 कोटींची आर्थिक तरतूद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.