क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने त्यांच्यावर १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
पुणे पुस्तक महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भेट दिली. पुणे पुस्तक महोत्सवात महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित गिनीजगाथा पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुकांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसत आहे.
नव्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे वाहन नोंदणी, वाहन परवाने, नूतनीकरण तसेच इतर सर्व परिवहन विषयक सेवा नागरिकांना स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२५ एकरवर जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्कची उभारणी होतेय. कोस्टल रोडची १७० एकर जागा असे एकूण २९५ एकरचे भवदिव्य सेंट्रल पार्क तयार केले जाणार आहे.
मुंबईतील दोन मोठ्या उपनगरांना जोडणारा ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्प वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते बोरीवली प्रवास अवघ्या 12 मिनिटांत शक्य होणार आहे.
Devendra Fadnavis Statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही. निवडणुका आल्यावरच असे संभ्रम निर्माण होतात.
भारतातील उत्पन्न विभाजन संबधित आरबीआय हँडबुकमधून धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामध्ये दिल्ली आणि गोव्याचे दरडोई उत्पन्न जवळपास ५ लाख आहे, तर उत्तर प्रदेश आणि बिहार हे केवळ १ लाखांच्या…
रोजच्या जेवणासाठी असणारी व्यवस्था अचानक कोलमडल्याने सर्व विद्यार्थी परेशान तर विद्यार्थ्यांचे पालक काळजीने हैराण झाले आहेत. या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागपूरमध्ये बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी महत्त्वाची राजकीय भूमिका स्पष्ट केली. आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले
नांदेडच्या सक्षम ताटे खून प्रकरणात दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. पोलीस ठाण्यात जाऊन या कुटुंबाने गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच मिळणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून देण्यात आली आहे.
साहित्य, संस्कृती आणि कलेचा उत्सव असणारा पुणे पुस्तक महोत्सव यंदा १३ ते २१ डिसेंबरदरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य स्वरूपात रंगणार आहे.