Pune Breaking: पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक; युनिव्हर्सिटीचे गेट तोडले अन्...; नेमके प्रकरण काय?
पुणे: पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनास सुरवात केली आहे. विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी आत घुसले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कुलगुरुंची भेट घेण्यासाठी ते आले आहेत. निकालात घोळ असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. एकूण मार्काच्या फक्त दहा टक्के ग्रेस असतो तर 50 मार्काच्या पेपरला जो पाच मार्काचा ग्रेस मिळाला पाहिजे तर एका विद्यार्थिनीला नऊ मार्क्स आहेत तरीसुद्धा तिला ग्रेस देऊन 20 मार्क्स केलेले आहेत 11 मार्क्स वाढवलेले आहेत. अशा विविध मुद्द्यांवरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक;विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी आत घुसले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.#PuneNews #PuneBreaking #MaharashtraNews #DailyUpdates #BreakingNews pic.twitter.com/Tn6JEVQjKI
— Navarashtra (@navarashtra) July 14, 2025
शेकडो विद्यार्थी विद्यापीठात ठिय्या आंदोलन करत आहेत. आमची पुन्हा परीक्षा घ्या अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे. विद्यापीठाच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यर्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यानी विद्यापीठाचे गेट तोडून आत प्रवेश केला आहे. आमच्या निकालामध्ये घोळ झाला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाचे कुलगुरू खाली येऊन आमचे निवेदन अथवा आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोवर आम्ही हटणार नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.