Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुचाकीवर तिघे बसल्यास दंड, मात्र पीएमपी बसमधील जीवघेण्या गर्दीकडे दुर्लक्ष; कारवाई कधी होणार?

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धावणाऱ्या पीएमपी बसबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दुसरीकडे पोलिसांकडून ट्रिपलशीट व नियभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असताना अशा बसवर कारवाई कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 26, 2026 | 12:30 AM
दुचाकीवर तिघे बसल्यास दंड, मात्र पीएमपी बसमधील जीवघेण्या गर्दीकडे दुर्लक्ष; कारवाई कधी होणार?

दुचाकीवर तिघे बसल्यास दंड, मात्र पीएमपी बसमधील जीवघेण्या गर्दीकडे दुर्लक्ष; कारवाई कधी होणार?

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरधाव पीएमपीच्या दारातून तरुणी रस्त्यावर पडल्यानंतर पाठिमागून आलेल्या एका स्कूल व्हॅनने तिला चिरडले आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धावणाऱ्या या पीएमपी बसबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दुसरीकडे पोलिसांकडून ट्रिपलशीट व नियभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असताना अशा बसवर कारवाई कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या खासगी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करून दंड आकारला जातो. दुचाकीवर तिघे बसले किंवा वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आढळल्यास नियमभंगाची कारवाई होते. शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमपीच्या बसमध्ये सर्रास क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असताना त्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी) येथे एम.टेकचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. गर्दीमुळे ती पीएमपी बसमधून खाली पडली आणि दुसऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पीएमपी बसमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पीएमपीची पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागात बससेवा आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १ हजार ९०० बस आहेत. मात्र, यातील काही बस सर्व्हिसिंग, दुरुस्ती आणि आरटीओशी संबंधित कामांमुळे रस्त्यावर नसतात. त्यामुळे प्रत्यक्षात दररोज सुमारे १,७०० ते १,८०० बसच प्रवाशांच्या सेवेत धावत असल्याचे चित्र आहे.

सकाळी आणि सायंकाळी कार्यालये, शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत अनेक मार्गांवरील बसमध्ये प्रचंड गर्दी होते. काही बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येते. गर्दीच्या वेळेचे नियोजन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त बसची व्यवस्था आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्यात पीएमपी कमी पडत असल्याची तक्रार आहे. एका बाजूला दुचाकीवर तीन जण बसल्यास किंवा कारमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास वाहतूक पोलिस कारवाई करतात. मग सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतानाही नियमांचा वेगळा निकष का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पीएमपी बसमधील गर्दीसोबतच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, त्याला नियम बनवावे अशी मागणी होऊ लागली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात गणेशाेत्सव निर्बंधमुक्त! प्रशासन सकारात्मक; पोलिस प्रशासनाला महापौरांची सूचना

चोरट्यांचे हक्काचे ठिकाण

पुणे शहरात चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांना पीएमपी बस आणि त्याचे थांबे हे ‘पर्वणी’ ठरू लागले आहेत. कारण, बसमध्ये प्रचंड गर्दी होते. तर, बसमध्ये चढताना देखील नागरिकांची चढाओढ असते. याचाच गैरफायदा घेऊन महिला व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत चोरीच्या घटना घडत आहेत. चोरटे गर्दीत बेसावध असलेल्या प्रवाशांना हेरून त्यांच्या गळ्यातील तसेच हातात असलेले दागिने चोरून नेतात. दुसरीकडे बसमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत चोरटे प्रवाशांना लुटतात. दुसरीकडे याठिकाणी अपघाताचा धोकाही असतो.

“पीएमपीकडे योग्य नियोजनाचा अभाव आहे. अनेक वेळा काही बस रिकाम्या धावताना दिसतात. मात्र, ज्या वेळेत आणि ज्या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते, त्या ठिकाणी जास्तीत जास्त बस सोडण्याचे नियोजन झाले पाहिजे. अनेक बस वेळापत्रकानुसार धावत नाहीत. काही वेळा अर्धा-अर्धा तास बस मिळत नाही. त्यामुळे प्रवासी मिळेल त्या बसमध्ये गर्दी असूनही चढतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन गर्दीच्या वेळेत अतिरिक्त आणि स्पेअर बसची व्यवस्था करणे आवश्यक आहे.” -जुगल राठी,  अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच.

Web Title: Commuters in pune are facing inconvenience due to overcrowding on pmp buses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • PMPML Bus
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026: ‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती! राखी बांधा आणि झाड लावा’, काय आहे विशेष उपक्रम?
1

Raksha Bandhan 2026: ‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती! राखी बांधा आणि झाड लावा’, काय आहे विशेष उपक्रम?

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच
2

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…
3

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…

चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा
4

चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.