Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Voter List Form 6 Form: मतदार नोंदणी सुलभ; प्रक्रियेला गती, नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ८३ हजार अर्ज

Pune Voter List: शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अवधे ३ हजार ४४१ अर्ज दाखल झाले आहेत. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि तरुण मतदारांची लक्षणीय उपस्थिती असलेल्या या मतदारसंघात नव्या मतदार नोंदणीसाठी अधिक अर्ज येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 23, 2026 | 06:55 PM
Pune News, Election Commission, Local Governance,

Pune News, Election Commission, Local Governance,

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणीसाठी सर्वाधिक ८३,५१४ अर्ज प्राप्त
  • हडपसर (१०,५०६) आणि शिरूर (१०,३८१) मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी
  • शिवाजीनगर आणि कसबा पेठ मतदारसंघात अर्जांची संख्या तुलनेने कमी
Pune Voter List Form 6 Form: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला पुणे जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः फॉर्म सहा मधील वाढीव तपशील वगळण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर झाल्यामुळे नवमतदारांसाठी नाव नोंदणी सुलभ झाली असून पत्त्यात बदल, बाहेरून पुण्यात दाखल झालेले मतदार आदींचेही अर्ज दाखल होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आवश्यक पुराव्याच्या कागदपत्रातही सुधारणा केल्यामुळे मतदारांना कमी त्रासात सहजतेने नावे दाखल करता येत आहेत.

Hinjawadi-Shivajinagar Metro: पंतप्रधानांचा दौरा लांबल्याने हिंजवडी मेट्रोला पुन्हा नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत आतापर्यंत तब्बल १ लाख १७ हजार शिरूर, हडपसरमध्ये सर्वाधिक अर्ज मतदारयादी अद्ययावतीकरणासाठी शिरूर विधानसभा मतदारसंघात १० हजार ३८१, तर हडपसरमध्ये १० हजार ५०६ अर्ज दाखल झाले आहेत. वहगाय शेरीमध्ये ९ हजार ७३, भीरमध्ये ९ हजार ३९६, चिंचवडमध्ये ८ हजार ४३४ आणि खेड-आळंदीमध्ये ८ हजार ११३ अर्जाची नोंद झाली आहे. या मतदार संघांत मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी तुलनेने अधिक प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी ही माहिती दिली.

८१८ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी आलेल्या ८३ हजार ५१४ अर्जाचा सर्वाधिक वाटा आहे. मात्र, शिवाजीनगर आणि कसबा पेठ या महत्त्वाच्या मतदारसंघांत अर्जाची संख्या तुलनेने कमी असल्याने या कडेवारीची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय आयोगाच्या सूचनेनुसार मतदारयादीतील नोंदींची पडताळणी आणि अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मतदारयादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी ३२ हजार ८८०, तर नावे वगळण्यासाठी १ हजार ४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

Most Wanted Maoist Surrender : मोस्ट वाँटेड माओवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण, कोलकाता पोलिसांना

शिवाजीनगर, कसबा पेठेत अर्जाची संख्या कमी

शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अवधे ३ हजार ४४१ अर्ज दाखल झाले आहेत. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि तरुण मतदारांची लक्षणीय उपस्थिती असलेल्या या मतदारसंघात नव्या मतदार नोंदणीसाठी अधिक अर्ज येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात अजाँची संख्या तुलनेने कमी आहे. कसबा पेठ मतदारसंघात ३ हजार ६४० अर्ज दाखल झाले आहेत, कोथरूडमध्ये ४ हजार ७६२. पर्वतीमध्ये ३ हजार ६. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ३ हजार ९२९, तर बारामतीमध्ये ३ हजार ८०० अर्ज आले आहेत.

 

अर्ज छाननीनंतरच चित्र स्पष्ट होणार

निवडणुकीच्या राजकारणात मतदारयादीला महत्त्वाचे स्थान असल्याने नवीन मतदारांची नोंदणी आणि विद्यमान मतदारांच्या तपशिलातील दुरुस्ती या प्रक्रियांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे विशेषतः नवमतदारांची संख्या आणि मतदारयादीती अचूक नोंदी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या उस् शकतात. मात्र, अर्जाची संख्या म्हणजे प्रत्यक्ष वाढलेल्या मतदारांची संख्या नव्हे, ते छाननी झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत एकूण किती अर्ज आले आहेत?

    Ans: पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतून एकूण १ लाख १७ हजार ८१८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

  • Que: नवीन मतदार नोंदणीसाठी सर्वाधिक अर्ज कोणत्या मतदारसंघात दाखल झाले आहेत?

    Ans: हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १० हजार ५०६ तर शिरूर मतदारसंघात १० हजार ३८१ अर्ज दाखल झाले आहेत.

  • Que: नाव नोंदणी प्रक्रिया सुलभ होण्याचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: केंद्रीय निवडणूक आयोगाने फॉर्म ६ मधील अतिरिक्त तपशील वगळल्यामुळे आणि पुराव्यांच्या कागदपत्रांत शिथिलता आणल्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुलभ झाली आहे.

Web Title: Pune district voter list revision campaign receives over 1 lakh applications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Election Commission
  • pune news

संबंधित बातम्या

Pune MLC Election: पुण्यात पदवीधर, शिक्षक मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रांवर गर्दी
1

Pune MLC Election: पुण्यात पदवीधर, शिक्षक मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रांवर गर्दी

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ
2

Cricket: सिद्ध राठोडचा तडाखा अन्…; आर्यन्स क्रिकेटने 333 रन्सने चारली आदिनाथ अकादमीला धूळ

पुण्यातील नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिकेकडून दुरुस्तीची कामे; नेहरू भवन ‘या’ तारखेपर्यंत बंद
3

पुण्यातील नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिकेकडून दुरुस्तीची कामे; नेहरू भवन ‘या’ तारखेपर्यंत बंद

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई
4

नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.