पुणे आणि पिंपरी-चिंचवडची दैनंदिन वाहतूक सांभाळणारी पीएमपीएमएल बस सेवा शहराची ‘रक्तवाहिनी’ मानली जाते. पण पीएमपी चालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणारी पीएमपीचे स्टियरिंग आता ठेकेदारांच्या हाती जाणार आहे. सध्या पीएमपीचे स्व मालकीचे १ हजार २५ बस असून ठेकेदारांचे १ हजार १७३ बस आहेत.
दररोज दहा ते अकरा लाख प्रवासी या बससेवेचा वापर करतात. अशावेळी बसमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी आणि आवश्यक वेळेस पुरावा म्हणून उपयोगी ठरणारे सीसीटीव्ही कॅमेरे अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये, पुणे महापालिकेच्या शाळांसाठी ५७ बसगाड्या, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी २२ बसगाड्या, असे करून एकूण ७९ बसगाड्यांची सोय विद्यार्थ्यांच्या सेवेत करण्यात आलेली आहे.
पुणे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यासाठी विशेष पोलीस पथक पीएमपी बससेवांमध्ये तैनात करण्यात आले आहे
आता पीएमआरडीएने देखील बस खरेदी करण्याची तयारी दाखवल्याने एक हजार बसेस खरेदी केल्या जाणार आहे. त्यासाठी 230 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या नव्या योजनेनुसार, पीएमपी बसमध्ये बसवण्यात येणाऱ्या AI कॅमेरांपैकी एक कॅमेरा थेट स्टिअरिंगजवळ लावण्यात येईल. या कॅमेऱ्याद्वारे बस चालकाच्या हालचालींवर देखील सतत निरीक्षण ठेवता येणार आहे.
महिला प्रवाशांना तात्काळ आणि मोफत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एकाही मार्गावर तेजस्विनी बस बंद न ठेवता सेवा सुरळीपणे सुरू रहावी, अशा सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.
पीएमपीएमएलच्या वार्षिक लेख्यांची तपासणी करून मुख्य लेखापरीक्षक कोळंबे यांनी हा अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. पीएमपीएमएलच्या प्रवासी संख्येत वाढ होत असली तरी संचलनातील तूट कमी झाल्याचे दिसून येत नाही.