
चार आमदार अन् दोन माजी माझ्या विरोधात लढत होते, पण...; विजयानंतर प्रशांत जगतापांची प्रतिक्रीया
पुण्यात आत्तापर्यंत काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या शिवरकरांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी महानगरपालिका निवडणूक लढवली होती.
अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते. त्याच भाजपाच्याअभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे. तर दुसरीकडे प्रशांत जगताप यांची आई रत्नप्रभा जगताप या पिछाडीवरती आहेत. तर प्रशांत जगताप १८०० मतांनी विजयी झाले आहेत.
हे सुद्धा वाचा : लातुरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; रविंद्र चव्हाणांना ‘ते’ वक्तव्य भोवणार
प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया
चार आमदार आणि दोन माजी राज्यमंत्री माझ्या विरोधात लढत होते. त्या सगळ्यांचा पराभव करून प्रशांत जगतापचा विजय झालेला आहे. हा विजय नक्कीच वानवडीतील जनतेचा आहे, त्यांच्या विश्वासाचा आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा माझ्याकडे काल जिवंत होती आणि आजही आहे आणि उद्याही राहील. पक्ष सोडताना जे जे माझी थट्टा करत होते, आदर्श आजकाल चालत नाही समाजात त्यांना माझा आजही नम्रपणे सल्ला आहे, आयडॉलॉजी कॅलरी जिवंत होती आजही आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा कोणी पुसू शकत नाही, यापुढे देखील सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घ्या, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास