संग्रहित फोटो
लातूर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. इथं सरासरी 60 टक्के मतदान झालं होतं. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत झाली होती. या पालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होती. एकूण सर्व पक्षांचे मिळून 369 उमेदवार रिंगणात होते. एकूण 70 जागांपैकी विजयासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. 36 हा बहुमताचा आकडा आहे.
दरम्यान छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील 5 महापालिकेतील निकालात एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार वेगळेच फेरबदल दिसून येत आहेत. नांदेडमध्ये भाजप 24 जागांवर आघाडीवर असून शिवसेना 12 आणि काँग्रेसने 12 जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. परभणीत शिवसेनेनं आघाडी घेतली असून 8 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. भाजप 2 आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे. जालन्यात भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास
संभाजीनगर मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांकडून मोठा बंदबस्त लावण्यात आला आहे. त्यासोबत ड्रोन कॅमेराद्वारे पेट्रोलिंग अनाउन्समेंट केली जात आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड वाघाळा आणि लातूर महापालिकेच्या निवडणुकांसाठी निकाल जाहीर होत आहे. महापालिकेच्या पहिल्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने संभाजीनगरमध्ये आघाडी घेतली आहे. लातूरमध्ये काँग्रेसने 16 जागी आघाडी घेतली आहे. भाजप 12 जागांवर आघाडीवर असून परभणीत ठाकरेंची शिवसेना 8 जागांसह आघाडीवर असून भाजप 2 तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे.






