Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“विधानसभेचा निकाल मतदारांना…”; रोहन सुरवसे पाटील यांचे निवडणुकीच्या निकालावर भाष्य

मतदार म्हणतात मतदान एकाला केले आणि निवडून दुसरेच आले. मतपेट्या बंद झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सीएनजी गॅसच्या किमती वाढल्या, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 30, 2024 | 06:03 PM
"विधानसभेचा निकाल मतदारांना..."; रोहन सुरवसे पाटील यांचे निवडणुकीच्या निकालावर भाष्य

"विधानसभेचा निकाल मतदारांना..."; रोहन सुरवसे पाटील यांचे निवडणुकीच्या निकालावर भाष्य

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: विधानसभा निवडणुकीचा निकाल कोणाला अपेक्षित, तर कोणाला अनपेक्षित असाच म्हणावा लागेल. मात्र, मतदाराला तो पटला नाही. राज्यात निकालानंतर कुठेही उत्साह दिसत नसल्याचे चित्र आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील निकाला संदर्भात संशयाची दबक्या आवाजात चर्चा आह. तर, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते थेटपणे ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा दावा करत आहेत. मतदान केंद्रावरील अधिकारी देखील चिडीचूप आहेत. बऱ्याच गावात एकूण मतदान आणि मतमोजणीतील आकड्यात तफावत आहे.

बऱ्याच मतदारसंघात झालेले मतदान आणि मोजणी झालेली आकडेवारी जुळत नाही, याला काय म्हणायचे? असा प्रश्न युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. सुरवसे-पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात मतदारांनी कंबर कसली होती. मोठा रोष जनतेत होता व तो आजही आहे.

“आम्हाला फुकट काही नको, विकत द्या पण नेमकेपणाने द्या. हाताला काम द्या, महागाईवर अंकुश ठेवा, मुला-बाळांना शिक्षण द्या, आरोग्य सुविधा द्या, रस्ते, पाणी, वीज अशा मुलभूत सुविधा हव्या आहेत. आम्हाला फुकट काही नको“ असा विचार कष्टकरी, कामगारवर्गाने केला होता. त्याच पद्धतीने त्यांनी मतदानही केले. मात्र, घडले वेगळेच. विधानसभा निकाल महायुतीचे निवडून आलेले आमदार सोडता कोणालाही रुचला नाही.

विचाराला प्राधान्य देणारा समाज आज भयग्रस्त झाला आहे. मागील अडीच वर्षांपासून फक्त कोण कोणावर टीका करतोय या बातम्यांना ऊत आला आहे. सकाळी-सकाळी सर्वच दूरचित्रवाहिन्यावर टीका-टीप्पणीच्या बातम्या आहेत. तोडा-फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीता अलीकडच्या राजकारण्यांनी अवलंबिली आहे का, असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे. छत्रपतींच्या राज्यामध्ये सामान्यांना न्याय होता, तो आता राहिला आहे का, अशी विचारणा सामान्य जनता करीत आहे, असे सुरवसे-पाटील यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मतदार म्हणतात मतदान एकाला केले आणि निवडून दुसरेच आले. मतपेट्या बंद झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सीएनजी गॅसच्या किमती वाढल्या. एक एक दिवस उलटला की, प्रत्येक वस्तूंची महागाई वाढलेली दिसणार आहे. प्रशासनात कोणी कोणाचे ऐकत नाही. सामान्यांना कुठेही न्याय मिळत नाही. आता सामान्यांनी दाद तरी कोणाकडे मागायची की गुलाम म्हणून जगायचे. एक्झिट पोलचे निकालही फोल ठरविले. ज्या उमेदवाराला ग्रामपंचायतीच्या अख्ख्या पॅनलमध्ये १२ मते पडली, तो उमेदवार निवडून येतोच कसा, उमेदवाराचा प्रचारही नाही, तोही निवडून आला. मायबाप सरकार तुम्हीच उत्तर द्या, अशी मतदार राजाकडून विचारणा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महायुती विरोधात जनतेच्या मनातील जो रोष लोकसभा निवडणूकीच्या वेळेला पाहायला मिळाला तो आजही कायम आहेच. विधानसभा निकाल हा जनतेचा कौल नसून मतदारांसोबत महायुतीने ईव्हीएम च्या माध्यमातून केलेली धोकेबाजी आहे. हा पूर्वनियोजीत निकाल असून लोकशाहीची हत्या भाजपने केली आहे. जनता मात्र आजही महाविकास आघाडीच्याच पाठीशी असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात आहे.

रोहन सुरवसे पाटील
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

Web Title: Congress leader rohan survase criticizes to maharashtra election evm machine process pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 06:03 PM

Topics:  

  • EVM Machine
  • Maharashtra Assembly election 2024
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.