Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: फेसबुकवर प्रेम, लिव्ह-इन, नंतर मंदिरात लग्न; अखेर पत्नीनेच पतीवर केला जीवघेणा हल्ला; कारण काय?

फेसबुकवर झालेल्या ओळखीपासून सुरू झालेलं प्रेम, लिव्ह-इन आणि नंतर मंदिरात लग्न… मात्र वैवाहिक वादातून पत्नीने हॉटेलमध्ये झोपलेल्या पतीवर ब्लेडने हल्ला केला. जखमी पतीवर उपचार सुरू असून आरोपी पत्नी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 10, 2026 | 11:22 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि नंतर मंदिरात लग्न केले.
  • हॉटेलमध्ये झोपलेल्या पतीवर पत्नीने ब्लेडने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला.
  • जखमी पती रुग्णालयात दाखल;गुन्हा दाखल करून आरोपी पत्नीचा शोध सुरू केला.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीवर ब्लेडने वार करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पत्नी सध्या फरार आहे. ही घटना पिपलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर येथील ‘कोमल पॅलेस’ हॉटेलमध्ये घडली. काय नेमकं प्रकरण?

Gadchiroli Crime: गडचिरोलीत आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी हा रक्तातील नात्याचा, काय घडलं नेमकं?

काय घडलं नेमकं?

आरोपीचे नाव ललित राजपूत (30) असे आहे. ललित हा मूळचा पिपलानी येथील गोपाल नगरचा रहिवासी आहे. त्याची पत्नी देनंदनी तोमर ही खाडवा येथील असून शाजापूर जिल्हा रुग्णालयात परिचारिका (नर्स) म्हणून कार्यरत आहे. ललित आणि देनंदनी यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यांनतर देनंदनीने लग्नाचं विचारलं असत ललितने लग्नास नकार दिल्याने देनंदनीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या कायदेशीर कचाट्यानंतर दोघांमध्ये तडजोड झाली आणि मे 2025 मध्ये आर्य समाज मंदिरात त्यांनी लग्न केले.

लग्नांनंतर देखील त्यांच्यात वाद मिटले नाहीत. ललित भोपाळमध्ये तर देनंदनी शाजापूरला राहत होती. ललितच्या मते, “पत्नीला सोबत राहायचे नाहीये,” तर देनंदनीचा आरोप होता की, “पती तिला सोबत ठेवायला तयार नाही.” शनिवारी देनंदनी ललितला भेटण्यासाठी आली होती. ललितने तिला राहण्यासाठी आनंद नगरमधील कोमल पॅलेस हॉटेलमध्ये खोली बुक करून दिली होती. याच वादातून शनिवारी रात्री हॉटेलमध्ये पुन्हा खडाजंगी झाली आणि त्याचे रूपांतर भीषण हिंसेत झाले.

रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ललित झोपला होता. त्याची जेव्हा झोप उघडली तेव्हा देनंदनीने त्याच्या छातीवर चढून हातावर आणि पोटावर ब्लेडने सपासप वार करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ललितने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये धाव घेतली आणि आतून कडी लावून घेतली. मात्र, संतापलेल्या पत्नीने तिथेही त्याचा पाठलाग केला आणि काचेच्या ग्लासने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. सुदैवाने, या हल्ल्यात ललितचा जीव वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाला आहे.

Buldhana Crime: चित्रपटालाही लाजवेल असा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’! तीनदा विष देऊनही अपयश, शेवटी रचला भयानक कट

गुन्हा दाखल

घटनेनंतर आरोपी देनंदनी घटनास्थळावरून फरार झाली आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी ललितला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पिपलानी पोलिसांनी ललितच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती

“आम्ही हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तिचे लोकेशन ट्रेस केले जात आहे,” अशी माहिती पिपलानी पोलिसांनी दिली. वैवाहिक वादातून एका सुशिक्षित महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याने या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: भोपाळमधील पिपलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंद नगर येथील कोमल पॅलेस हॉटेलमध्ये ही घटना घडली.

  • Que: हल्ला कसा झाला?

    Ans: पत्नीने झोपलेल्या पतीवर ब्लेडने वार केले आणि काचेच्या ग्लासने डोक्यावर प्रहार केला.

  • Que: सध्या प्रकरणाची स्थिती काय आहे?

    Ans: जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आरोपी पत्नी फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

Web Title: Pune crime love on facebook live in relationship then a temple wedding ultimately the wife herself launches a life threatening attack on her husbandwhat was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
4

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.