Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gairan Lands PMC: राज्यातील ७,८८७ हेक्टर गायरान जमिनी आता सरकारच्या मालकीच्या होणार

या गायरान जमिनी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे केल्या जातील, स्थानिक स्वराज्य संस्थ्यांकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याशी हा कररार करून त्यांना या जमिनी दिल्या जातील.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 10, 2026 | 10:01 AM
MLRC Amendment 2026, Chandrashekhar Bawankule, PMC Gai-ran Land,

MLRC Amendment 2026, Chandrashekhar Bawankule, PMC Gai-ran Land,

Follow Us
Follow Us:
  • जमिनींचे अधिग्रहण करताना आता पोस्टाऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (E-notice) नोटीस पाठवली जाणार
  • अतिक्रमणे रोखण्यासाठी या जमिनींच्या भोवती संरक्षक भिंती उभारून त्या सुरक्षित केल्या जाणार
  • नगरपंचायतींचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर त्यांनाही या नियमात समाविष्ट केले जाईल.
Gairan Lands PMC: राज्यातील महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या क्षेत्रातील हजारो हेक्टर गायरान जमिनी आता अधिकृतपणे राज्य शासनाच्या मालकीच्या होणार आहेत. या संदर्भातील महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या सुधारणा विधेयकाला सोमवारी विधानसभेने एकमताने मंजुरी दिली. या जमिनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांना सार्वजनिक उपयोगासाठी नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सुधारणा विधेयक सभागृहात सादर केले. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, “राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रांत ३ हजार ३७८ हेक्टर आणि २४७ नगरपरिषदांच्या क्षेत्रांत ४ हजार ५०९ हेक्टर अशी एकूण ७ हजार ८८७ हेक्टर गायरान जमीन उपलब्ध आहे. एकट्या पुणे महापालिका हद्दीत ८८६ हेक्टर गायरान जमीन आहे. पण वाढत्या शहरीकरणामुळे आता या क्षेत्रात गायी-गुरे राहिलेली नाहीत. या जमिनांचा कोणताही वापर होत नाही. रिकाम्या जमिनींवर अतिक्रमणे होत असल्याने, त्यांचा ताबा शासनाकडे घेऊन सार्वजनिक विकासकामांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे.

कासच्या बारामाही पर्यटनाचे वन विभागाकडून तीनतेरा? अधिकारी बदलले की नियमही बदलतात

या गायरान जमिनी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे केल्या जातील, स्थानिक स्वराज्य संस्थ्यांकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याशी हा कररार करून त्यांना या जमिनी दिल्या जातील. या गायरान जमिनी कोणत्याही व्यवसायिका वापरासाठी वापरल्या जाणार नाहीत. जमिनींचे अधिग्रहण करताना पोस्टाने नोटीस पाठवणे बंधनकारक होते. पण आता इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने नोटीस पाठवली जाईल. असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

या सुधारणा विधेयकाला सभागृहातील दोन्ही बाजुंच्या सदस्यांनी बहुमाताने पाठिंबा दिला. सोबतच हा नियम नगरपंचायत क्षेत्रालाही लागू करावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र नगर पंचायतींचा विकास आराखडा अद्याप मंजूर झालेला नाही. नगर पंचायतींचा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर अधिवेशनात या विधेयकात सुधारणा केली जाईल, असेही बावनकुळेंनी सांगितलं.

दरम्यान, जिल्हादिखाऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, झोपडपटट्या उभारल्या जाऊ शकतात, त्या कोण हटवणार, असा मुद्दा आमदारांकडून उपस्थित कऱण्यात आला. त्यावर या गायरान जमिनींच्या भोवती भिंती बांधल्या जातील, त्या संरक्षित केल्या जातील, असे उत्तर बावनकुळेंकडून देण्यात आले.

नव्या वादाची ठिणगी

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या क्षेत्रातील हजारो हेक्टर गायरान जमिनी राज्य शासनाच्या मालकीच्या करण्याच्या निर्णयावरून मात्र नव्या वादाची ठिणगी पडली आहे. गायरान जमिनींबाबत राज्या सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे दरोड असल्याची टिका काही सामाजिक संघटना आणि अभ्यासकांनी केली आहे.

BMC मध्ये पारदर्शकतेचे नवे पर्व! मुंबईसाठी भाजपचा १०० दिवसांचा ‘२० सूत्रीय’ कार्यक्रम

 

काय आहे आक्षेप?

आतापर्यंत गायरान जमिनींचा वापर प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती आणि समाजातील इतर दुर्बल घटकांच्या घरकुल योजनांसाठी केला जात होता. मात्र, नवीन सुधारणा विधेयकानुसार या जमिनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे (महानगरपालिका) हस्तांतरित केल्या जाती . या जमिनी शहरातील मोक्याच्या ठिकाणी असून त्यांची बाजारपेठीतील किंमत सद्या शेकडो कोटींच्या घरात आहे.

खाजगीकरणाची भीती:

“विकासाच्या नावाखाली या जमिनी शेवटी खाजगी विकासकांच्या (बिल्डर्स) घशात घातल्या जातील,” असा गंभीर आरोप टीकाकारांनी केला आहे. नैसर्गिक संसाधनांवर असलेल्या वंचित घटकांच्या अधिकारावर गदा आणणारा हा निर्णय असल्याचे मत व्यक्त होत आहे. महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय गरिबांच्या हक्काचे घर हिरावून घेणारा ठरेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात असून आगामी काळात यावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title: Gairan lands pmc 7887 hectares of uncultivated land in the state now belongs to the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Marathi News
  • Pune
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.