
photo- social media
महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; नावली गावातील काही भाग खचला, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर
पालखी मार्गावरील तसेच मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या सोसायट्या, धर्मशाळा आणि दिंडी थांबणाऱ्या भागांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने १००९ फिरती शौचालये उभारण्यात आली असून जर्मन टेंट परिसरात आणखी १०० फिरती शौचालये बसविण्यात येणार आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी एकूण ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी २२ ठिकाणी टँकरची व्यवस्था करण्यात आली असून महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत प्रकाशझोत उभारण्यात आले आहेत. इंद्रायणी नदी परिसरात महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय प्रत्येक दिंडीसाठी प्राथमिक उपचार पेटी देण्यात येणार असून आरोग्य व प्रवासासंबंधी कोणतीही मदत आवश्यक असल्यास एकाच ठिकाणी संपर्क कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे. स्वच्छता आणि साफसफाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळही नियुक्त करण्यात आले आहे.
वारकरी भाविकांचे स्वागत आणि सेवा करण्यासाठी देहूनगर पंचायतीने सर्वंकष नियोजन केले असून पालखी सोहळा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे चित्र दिसून येत आहे.