Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उर्वरित सुमारे ४० हेक्टर जमीन आता सक्तीने संपादित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 03, 2026 | 05:55 PM
पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Follow Us
Follow Us:

पुणे : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उर्वरित सुमारे ४० हेक्टर जमीन आता सक्तीने संपादित करण्यात येणार आहे. संमतीने जमीन देण्यासाठी संबंधित जमीनमालकांना प्रशासनाने अनेकदा मुदतवाढ दिली; मात्र, त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने कायद्यानुसार सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

विमानतळासाठी वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांमधील सुमारे १,२१६ हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन आहे. यापैकी ९६ टक्के जमीनमालकांनी संमतीने भूसंपादनाला प्रतिसाद दिला असून, सुमारे ६० टक्के शेतकऱ्यांना मोबदला वितरित करण्यात आला आहे. उर्वरित चार टक्के म्हणजेच सुमारे ४० हेक्टर क्षेत्रातील जमीन मालकांनी अद्याप संमती दिलेली नाही. संमतीने जमीन देणाऱ्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्यासह संपादित जमिनीच्या बदल्यात १० टक्के विकसित भूखंड देण्याची तरतूद आहे. मात्र, सक्तीने संपादन होणाऱ्या जमीन मालकांना हा लाभ मिळणार नाही. त्यांना नियमानुसार केवळ भूसंपादनाचा मोबदला दिला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : दहीहंडीतील अश्लील नृत्याला पोलिसांचा ‘ब्रेक’! आक्षेपार्ह कार्यक्रम झाल्यास थेट…; पोलीस आयुक्तांचा इशारा

अनेकदा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद नाही

पुरेसा कालावधी आणि अनेकदा मुदतवाढ देऊनही ४० हेक्टर क्षेत्रातील खातेदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे ही जमीन आता नियमानुसार सक्तीने संपादित केली जाईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले. विमानतळाच्या कामाला विलंब होऊ नये यासाठी पुढील प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

पुरंदरमधील विमानतळ प्रकल्प सुरुवातीला एका भागात निश्चित केला. त्यानंतर ही जागा योग्य नाही असे म्हणत दुसऱ्या जागेची निवड केली. त्यानंतर पुन्हा निवडलेली जागा अयोग्य असल्याचे सांगून पूर्वीची जागा निश्चित केली. त्यामुळे सुरुवातीला योग असलेली जागा नंतर अयोग्य कशी झाली आणि पुन्हा तीच योग्य असल्याचे कशावरून सांगत आहात याचे स्पष्टीकरण द्यावे, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यामुळे शासनाची चांगलीच कोंडी झाली आहे.

हे सुद्धा वाचा : टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

Web Title: District collector jitendra dudi has provided important information regarding the land for the purandar airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Farmers
  • Jitendra Dudi
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
1

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली
2

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक
3

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी
4

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.