Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड

आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील बळीराजा आणि व्यापारी वर्गाचे इंधन दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे. डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 05, 2026 | 12:30 AM
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड

Follow Us
Follow Us:

ओतूर/ मनोहर हिंगणे : देशभरात सातत्याने होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा मोठा भडका आता जुन्नर तालुक्यात उडाला आहे. आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील बळीराजा आणि व्यापारी वर्गाचे या इंधन दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे. डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढला असून, याचा थेट परिणाम म्हणून जुन्नर तालुक्यातील मालवाहतूक वाहन व्यावसायिक संघटनेने वाहतूक भाड्यात १५ ते २० टक्क्यांची मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

वाहन चालकांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकरी, किरकोळ व ठोक व्यापारी आणि पर्यायाने सर्वसामान्य ग्राहकांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. जुन्नर, नारायणगाव, ओतूर आणि आळेफाटा या प्रमुख व्यापारी बाजारपेठांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जुन्नर तालुका हा प्रामुख्याने भाजीपाला, टोमॅटो, कांदा आणि बटाटा उत्पादनात अग्रेसर मानला जातो. येथील जुन्नर ओतूर, आणि नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दररोज शेकडो टन भाजीपाला मुंबई (वाशी), पुणे आणि परराज्यांतील बाजारपेठांमध्ये रवाना होत असतो. मात्र, डिझेलच्या दराने शंभरी पार करून नवा उच्चांक गाठल्याने वाहतूकदारांनी भाडेवाढ लागू केली आहे. खते, बियाणे, औषधे आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेती आधीच तोट्यात चालली आहे. त्यात आता वाहतूक भाडे वाढल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च दुप्पट झाला आहे. अनेकदा बाजारपेठेत भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नाही. अशा स्थितीत वाढीव भाडे देऊन माल बाजारात नेणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे झाले आहे. वाहतूक खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर शेतीमाल शेतातच सोडून देण्याची किंवा स्थानिक पातळीवर कवडीमोलाने विकण्याची वेळ आली आहे.

डिझेल दरवाढीचा आणि मालवाहतूक भाडेवाढीचा थेट फटका जुन्नरच्या व्यापारी जगताला बसला आहे. मुंबई, गुजरात आणि इतर भागांतून येणारा किराणा माल, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि प्रामुख्याने सिमेंट-स्टील यांसारख्या बांधकाम साहित्याची वाहतूक महागली आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, वाहतूक खर्च वाढल्याने वस्तूंची मूळ किंमत वाढवावी लागत आहे. वस्तू महागल्यामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली असून, खरेदीचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक मंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घाऊक व्यापाऱ्यांपासून ते अगदी गल्लीबोळातील किरकोळ विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच या दरवाढीची झळ सोसावी लागत आहे.

वाहतूक व्यवसाय आधीच व्हेंटिलेटरवर

दुसरीकडे, मालवाहतूक करणाऱ्या वाहन धारकांची बाजूही तितकीच बिकट झाली आहे. “आम्हाला हौस म्हणून भाडेवाढ करावी लागत नाही, तर ही आमची जगण्याची धडपड आहे,” अशी प्रतिक्रिया वाहन मालकांनी दिली आहे. डिझेलच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे जुन्या दराने गाड्या चालवणे आता अशक्य झाले आहे. गाड्यांचे बँक हप्ते (EMI), वार्षिक इन्शुरन्स, आरटीओ टॅक्स, टायरचे वाढलेले भाव आणि महामार्गांवरील टोल टॅक्स यामुळे वाहतूक व्यवसाय आधीच व्हेंटिलेटरवर आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे हा व्यवसाय पूर्णपणे तोट्यात आला असून, भाडेवाढ न केल्यास गाड्या उभ्या करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा : कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांचे काम वेगात, विखे पाटलांचे कौतुक; पण मनोज जरांगे यांनी व्यक्त केली ‘ही’ मोठी शंका

सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य

जुन्नर तालुक्यातील या परिस्थितीवरून स्पष्ट होते की, डिझेलच्या दरवाढीने केवळ वाहतूकदारच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आणि व्यापारीही होरपळून निघाला आहे. इंधनाचा हा भडका वेळीच शांत न झाल्यास, येत्या काळात भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडतील आणि सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने कर कपात करून डिझेलचे दर आटोक्यात आणावेत, अशी आर्त हाक जुन्नर तालुक्यातून दिली जात आहे.

Web Title: Farmers and traders in junnar taluka are in trouble due to the increase in petrol and diesel prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Farmers
  • junnar news
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
1

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
2

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
4

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.