मनोज जरांगे यांनी व्यक्त केली 'ही' मोठी शंका (Photo Credit- X)
जरांगे हे शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, बुधवारी सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारने काही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली तरी अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप निकाली निघाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत, शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ आणि मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्याबाबतची माहिती मिळाली असली तरी ती अद्याप अधिकृत झालेली नाही. मात्र, या विषयांवर चर्चा सुरू असून सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नोंदीधारकांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून शासनाची यंत्रणा घरोघरी जाऊन प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, कुणबी नोंदी नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही याबाबत अधिकृत आदेशाची प्रतीक्षा असल्याचे सांगत सरकारने सर्व निर्णय लेखी स्वरूपात द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील चांगले काम करत असून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ मिळत असल्याचेही जरांगे यांनी नमूद केले. ५८ लाख कुणबी नोंदींच्या पडताळणी व प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेसाठी प्रशासनाने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले असून, जिल्हाधिकारी स्तरावर कार्यवाही होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
लवकरच शाळा, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सचिव स्तरावरून स्पष्ट आदेश काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Maratha Reservation वर दादा भुसे यांचे वक्तव्य, “सरकार मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील”






