Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

नवीन द्राक्ष बागा उभारणीसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 30, 2025 | 12:41 PM
द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली 'ही' मोठी मागणी

द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
  • अतिवृष्टीमुळे द्राक्ष हंगाम वाया
  • नवीन द्राक्ष बागा उभारणीसाठी पॅकेजची मागणी
रांजणी : आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी जिल्हा बँकेच्या वतीने सहकारी सोसायटीमार्फत करोडो रुपयांचे पीक कर्ज आणि दिर्घ मुदतीचे कर्ज घेतले आहे. अतिवृष्टीमुळे या हंगामात तालुक्यातील सुमारे ७० टक्के द्राक्ष बागांना घड निर्मिती झाली नाही. त्यामुळे यंदा द्राक्षांचा हंगाम वाया गेल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याज माफ करावे. पीक कर्ज मार्च अखेर वसूल न करता एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, तसेच नवीन द्राक्ष बागा उभारणीसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

आंबेगाव तालुक्यात जवळजवळ ५०० एकर क्षेत्र द्राक्ष लागवड झाली आहे. जम्बो जातीच्या द्राक्ष निर्यातीत पुणे जिल्ह्यात आंबेगाव आणि जुन्नर तालुका अग्रेसर समजला जातो. अन्य फळबागांच्या तुलनेत द्राक्ष पिकाचा खर्च हा अधिक असतो. द्राक्ष पीक वार्षिक असल्याने वर्षभर बागेच्या संगोपनासाठी खर्च करावा लागतो. घड निर्मितीपूर्वी दोन लाख आणि घड निर्मिती झाल्यानंतर पुढील चार महिन्यांत दोन लाख रुपये असा एकरी चार लाख रुपये द्राक्ष बागेला खर्च येतो. नवीन द्राक्षबाग उभारण्यासाठी सुमारे नऊ लाख रुपये खर्च येतो. द्राक्ष निर्यातीतून पैसे मिळवून देणारे हे पीक हवामान बदलामुळे मागील काही वर्षात अडचणीत सापडले आहेत.

सोसायटी मार्फत करोडो रुपयांचे कर्ज

राज्यातील दोन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्या आहेत. द्राक्षबागा वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने द्राक्ष उत्पादकांना पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर किमान जुन्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याज माफ करणे, कर्ज वसुली तूर्त थांबवणे आवश्यक असल्याची मागणी आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील द्राक्ष बागायतदार संदीप डोके या शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान रांजणी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव संदिप वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी सोसायटी मार्फत करोडो रुपयांचे कर्ज घेतलेले असल्याचे सांगितले.

लाखो रुपये खर्चाची गुंतवणूक

शेतकऱ्यांना द्राक्ष बागांची उभारणी करण्यासाठी लाखो रुपये खर्चाची गुंतवणूक करावी लागते. फवारणीसाठी ट्रॅक्टरची गरज असते. मशागतीसाठी अवजारे मोठ्या प्रमाणात घ्यावी लागतात. त्यामुळे एकूणच द्राक्ष बाग उभारणीचा एकूण विचार केला तर कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक द्राक्ष बागेसाठी करावी लागते. जिल्हा मध्यवर्ती बँकेसह पतसंस्था आणि विविध राष्ट्रीयकृत बँकेकडून यावर्षी शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकासाठी कर्ज घेतले आहे. या कर्जाचा आकडा काही कोटी रुपयांच्या घरात आहे. जिल्हा बँकेच्या वतीने सहकारी सोसायटी मार्फत करोडो रुपयांचे पीक कर्ज आणि दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यात आले आहे.

शेतकरी आर्थिक संकटात

एकूणच यंदा द्राक्ष बागांचा विचार केला तर अतिवृष्टीमुळे तालुक्यात द्राक्षांचा जवळ जवळ 70 टक्क्याहून अधिक हंगाम वाया गेला. सोसायटी मार्फत घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा द्राक्ष उत्पादकांपुढे मोठा चिंतेचा विषय झाला. शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Web Title: Farmers in ambegaon taluka have made a big demand from ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • ajit pawar
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!
1

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा
2

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी
3

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही
4

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.