Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात अचानक मादी नीलगाईचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

Katraj Zoo News: नीलगाय हे कुरंग कुळातील हरीण असून दिसण्यात गाईशी साम्य असल्याने ‘नीलगाय’ हे नाव प्रचलित झाले. इंग्रजीत याला ‘ब्लूबुल’ असे म्हणतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 28, 2025 | 09:11 PM
मोठी बातमी! राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात अचानक मादी नीलगाईचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

मोठी बातमी! राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात अचानक मादी नीलगाईचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

Follow Us
Follow Us:

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात एका मादी नीलगाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याबाबतची माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली. नीलगाईच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक तपासणी सुरू आहे. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूमागील कारण निश्चित करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पैथोलॉजी विभागातील तज्ज्ञांकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार नीलगाईच्या शरीरात मोठी गाठ आढळून आली आहे. मात्र या गाठीचे स्वरूप आणि त्याचा मृत्यूशी असलेला संबंध याबाबतची खात्री मिळणाऱ्या सविस्तर अहवालानंतरच होणार आहे. मृत नीलगाय ही ५ फेब्रुवारी २०१२ रोजी जन्मलेली मादी होती. प्राणी संग्रहालयात एकूण १ नर व ५ मादी नीलगायी होत्या. या घटनेनंतर आता १ नर आणि ४ मादी नीलगायी प्राणी संग्रहालयात उरल्या आहेत. अशी माहिती प्राणी संग्रहालयाच्या उपसंचालिका डॉ. सुचित्रा सुर्यवंशी यांनी दिली.

नीलगाय हे कुरंग कुळातील हरीण असून दिसण्यात गाईशी साम्य असल्याने ‘नीलगाय’ हे नाव प्रचलित झाले. इंग्रजीत याला ‘ब्लूबुल’ असे म्हणतात. भारतातील कोरड्या प्रदेशात या प्रजातींचा मुख्य वावर आढळतो. राजस्थान आणि मध्य प्रदेशात यांची संख्या अधिक आहे. गाईसारखे साम्य आणि पवित्रतेची भावना यामुळे या प्राण्यांची शिकार तुलनेने कमी होते.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकीट दरवाढीला महापालिकेची मंजुरी

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने तिकिट दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. प्राणीसंग्रहालयात नवीन प्राणी दाखल होणार असतानाच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, प्राणीसंग्रहालयासाठी महापालिकेकडून होणारा खर्च, मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक आहे. प्राण्यांच्या अन्नाचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल आणि विस्तार योजनांवर मोठा निधी खर्च होत आहे.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकीट दरवाढीला महापालिकेची मंजुरी; ‘असे’ असतील नवीन दर

असे असतील नवीन दर

नवीन दरांनुसार प्रौढांसाठी तिकिट 40 रुपयांवरून 60 रुपये, मुलांसाठी 10 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आले आहे. परदेशी पर्यटकांना 100 ऐवजी 150 रुपये आकारले जातील. खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना 20 व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना 10 रुपये शुल्क आकारले जाईल. प्राणीसंग्रहालयात लवकरच झेब्रा, माउस डियर, सिंह, माकड, तसेच मर्मोसेट, टॅमरिन आणि जंगली कुत्रे दाखल होणार आहेत. सर्प उद्यानाचे पुनर्विकसनही सुरू आहे.

 

Web Title: Female nilgai dies suddenly at rajiv gandhi zoo katraj pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 09:09 PM

Topics:  

  • animal
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra MLC Election 2026: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
1

Maharashtra MLC Election 2026: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

ऑटोमोबाईल पार्ट्स बनवणाऱ्या शॅफलर इंडियाच्या CEO ताब्यात! तळेगाव कारखाना गॅस गळती दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई
2

ऑटोमोबाईल पार्ट्स बनवणाऱ्या शॅफलर इंडियाच्या CEO ताब्यात! तळेगाव कारखाना गॅस गळती दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई

Pune Division Graduate Teachers MLC Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ला बालेवाडीत मतमोजणी
3

Pune Division Graduate Teachers MLC Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ला बालेवाडीत मतमोजणी

Pune Farmer ID Seva Sankalp Abhiyan: पुणे जिल्ह्यात ७.२३ लाख फार्मर आयडी तयार; पीएम किसान योजनेतून १,९०८ कोटींचे वितरण
4

Pune Farmer ID Seva Sankalp Abhiyan: पुणे जिल्ह्यात ७.२३ लाख फार्मर आयडी तयार; पीएम किसान योजनेतून १,९०८ कोटींचे वितरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.