Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

थेट रेल्वे सेवेमुळे भाविक आणि पर्यटकांची अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर पूर्ण होत आहे.‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांची संख्या मोठी आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 17, 2026 | 11:30 AM
पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

पुणे-साईनगर शिर्डी दरम्यान पहिली दैनंदिन एक्सप्रेस सुरू; रेल्वेमंत्री आज दाखवणार हिरवा झेंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो भाविक आणि प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यान पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते (दि.१७) दुपारी ३:३० वाजता पुणे रेल्वे स्थानक येथून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाईल.

या थेट रेल्वे सेवेमुळे भाविक आणि पर्यटकांची अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर पूर्ण होत आहे.‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांची संख्या मोठी आहे. ही पहिली थेट रेल्वे सेवा असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि गट-पर्यटकांचा प्रवासाचा त्रास वाचणार आहे. सुरक्षित, परवडणारा आणि आरामदायी प्रवास उपलब्ध झाल्यामुळे वृद्ध भक्तांची मोठी सोय होईल.

स्थानिक अर्थव्यवस्था आणि शिक्षणाला गती

या रेल्वेमुळे केवळ धार्मिक पर्यटनालाच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. शिर्डी परिसरातील हॉटेल्स, टॅक्सी व्यावसायिक आणि छोट्या विक्रेत्यांच्या व्यवसायात वाढ होईल. तसेच, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील रहिवाशांना पुण्यातील उच्च शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.

सण-उत्सवाच्या गर्दीतही मिळेल Confirm Tatkal Ticket ! या 5 खास ट्रिक्स आणि बुकिंग होईल सुपरफास्ट!

‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर असेल थांबा…

– दौंड कॉर्ड केबिन : पुणे आणि मनमाड मार्गादरम्यान जलद प्रवासासाठी उपयुक्त.
– श्रीगोंदा : स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर.

– अहिल्यानगर : प्रशासकीय व लष्करी केंद्रातील नोकरदारांसाठी सोयीचे.
– राहुरी : येथील ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठातील’ विद्यार्थी आणि संशोधकांना मोठा लाभ.

– बेलापूर : साखर कारखान्यांचे क्षेत्र आणि प्रसिद्ध ‘शनि शिंगणापूर’ मंदिराचे प्रवेशद्वार.

विद्यार्थ्याची तक्रार अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा

जयपूरमधील मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MNIT) येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रेल्वे, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेची तिकीट बुकिंग प्रणाली अधिक सुधारण्यासाठी १५ जुलैपर्यंत एक नवीन IRCTC वेबसाइट सुरू केली जाईल. ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना IRCTC वेबसाइट अनेकदा हँग होते आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते, अशी थेट तक्रार एका विद्यार्थ्याने केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

Pimpri Chinchwad : धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे प्रशासनाची धावपळ; ‘या’ तारखेनंतर पाणीकपातीच्या निर्णयाचे संकेत

Web Title: First direct daily express train between pune and sainagar shirdi will run from today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Train News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.