Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक कोटींपर्यंतच्या विकासकामांना हिरवा कंदील; पुणे मनपा आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

मनपाच्या २०२५-२६ च्या अंदाजपत्रकाचा आकार सुमारे ११ हजार ६२७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात सुमारे १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 10, 2026 | 12:07 PM
एक कोटींपर्यंतच्या विकासकामांना हिरवा कंदील; पुणे मनपा आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक कोटींपर्यंतच्या विकासकामांना हिरवा कंदील; पुणे मनपा आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महानगरपालिकेत विकासकामांच्या मंजुरीवरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विविध विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांमार्फत राबवण्यात येणाऱ्या एक कोटी रुपयांपर्यंतच्या विकासकामांसाठी आता वित्तीय समितीची पूर्वमंजुरी आवश्यक राहणार नाही. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नगरसेवकांकडून वित्तीय समितीमुळे विकासकामांना विलंब होत असल्याची तक्रार सातत्याने केली जात होती. त्यामुळे समिती बरखास्त करण्याची मागणीही पुढे आली होती. मात्र, समिती पूर्णपणे रद्द न करता आयुक्तांनी समन्वयाचा मार्ग स्वीकारत लहान आणि मध्यम स्वरूपाच्या कामांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

विकास लवांडे यांच्यावरील शाईहल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान, हल्लेखारांवर कठोर कारवाई करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मनपाच्या २०२५-२६ च्या अंदाजपत्रकाचा आकार सुमारे ११ हजार ६२७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात सुमारे १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, उत्पन्नात अपेक्षित वाढ न झाल्याने मनपासमोर तीन हजार कोटी रुपयांहून अधिक तुटीचे आव्हान उभे आहे. मालमत्ता कर आणि जीएसटी नुकसानभरपाई हे मनपाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत मानले जातात.

कोरोना काळात खर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी वित्तीय समितीची स्थापना केली होती. अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा परीक्षक आणि मुख्य अभियंता यांचा या समितीत समावेश आहे. समितीमुळे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांत सुमारे २५० कोटी रुपयांच्या अनावश्यक निविदा रोखण्यात यश आल्याचे सांगितले जाते.

पूर्वी २५ लाख रुपयांपर्यंतच्या कामांना सूट देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, आता ती मर्यादा थेट एक कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत होणारी दुरुस्ती, रस्ते आणि स्थानिक विकासकामे अधिक वेगाने पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Green signal for development works up to 1 crore pune municipal commissioners significant decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
1

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी
2

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
3

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी
4

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.