Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

येरवडा दुर्घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडमध्ये; कंत्राटदाराची सर्व कामे काढणार

येरवडा परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 20, 2026 | 04:50 PM
येरवडा दुर्घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडमध्ये; कंत्राटदाराची सर्व कामे काढणार

येरवडा दुर्घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडमध्ये; कंत्राटदाराची सर्व कामे काढणार

Follow Us
Follow Us:
  • येरवड्यात १५ फूट खोल खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
  • संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस
  • कंत्राटदाराची सर्व कामे काढून घेणार
पुणे : येरवडा परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे. कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्याला काळ्या यादीत टाकण्यासह त्याच्याकडे सुरू असलेली सर्व कामे काढून घेण्यात येणार आहेत. तसेच, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

 

घटनास्थळी खड्ड्याभोवती करण्यात आलेले बॅरिकेडिंग मजबूत नव्हते. तेथे फायबरचे बॅरिकेडिंग लावण्यात आले होते. त्यामुळे अपघाताच्या वेळी ते पुरेशी सुरक्षा देऊ शकले नाही. संबंधित कंत्राटदाराचे काम निर्धारित उद्दिष्टानुसार वेगाने सुरू होते; मात्र, सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये झालेली चूक गंभीर आहे. मजबूत बॅरिकेडिंग केले असते, तर ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचू शकला असता, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. सामान्यतः एखाद्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई विशिष्ट प्रकल्पापुरती मर्यादित असते. मात्र, या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराकडे सुरू असलेली सर्व कामे काढून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कारवाईपूर्वी कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस देऊन त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर नियमानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याबाबतही चौकशी

संबंधित कंत्राटदाराकडे शहरात किती कामे सुरू आहेत, याची माहिती संकलित केली जात आहे. शहरात ड्रेनेज आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत. या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या जातील. चौकशीत समोर येणाऱ्या त्रुटींच्या आधारे नवी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात येईल, असे राम यांनी सांगितले. अपघातानंतर ज्येष्ठ नागरिकाला राजीव गांधी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना कोणत्या परिस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आणि त्याच रात्री त्यांचा मृत्यू कसा झाला, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. अपघातात वाहनचालकाची किंवा मृत व्यक्तीची काही चूक होती का, याचा तपास पोलिस करतील. मात्र, ड्रेनेजच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये झालेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा

महापौरांच्या प्रतिक्रियेवरून वाद निर्माण

येरवड्यात महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेबाबत प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकाराला उत्तर देण्याऐवजी, मी काय कॉन्ट्रॅक्टर आहे का? मी त्या माणसाला ढकललंय का? मी गाडी चालवत होते का? असे प्रतिप्रश्न करत पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी जबाबदारीबाबत हात झटकल्याची टीका होत आहे. या संभाषणाची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर महापौरांच्या प्रतिक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: येरवडा परिसरात नेमकी कोणती दुर्घटना घडली?

    Ans: येरवडा परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्ड्यात पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. खड्ड्याभोवती करण्यात आलेले बॅरिकेडिंग पुरेसे मजबूत नसल्याचे समोर आले आहे.

  • Que: संबंधित कंत्राटदारावर महापालिका कोणती कारवाई करणार आहे?

    Ans: महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याला काळ्या यादीत टाकण्यासह त्याच्याकडे सुरू असलेली सर्व कामे काढून घेण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तसेच, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.

  • Que: अपघाताचे प्रमुख कारण काय होते?

    Ans: घटनास्थळी खड्ड्याभोवती फायबरचे बॅरिकेडिंग करण्यात आले होते. ते पुरेसे मजबूत नसल्यामुळे आवश्यक सुरक्षा मिळाली नाही. मजबूत बॅरिकेडिंग केले असते, तर ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचू शकला असता, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

Web Title: Following the yerwada incident the pune municipal corporation has issued a notice to the contractor nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Football: यजमान लोयोलाचा दुहेरी पराभव! सेंट व्हिन्सेंट्स अन् ‘हे’ संघ ठरले फुटबॉलचे नवे चॅम्पियन
1

Football: यजमान लोयोलाचा दुहेरी पराभव! सेंट व्हिन्सेंट्स अन् ‘हे’ संघ ठरले फुटबॉलचे नवे चॅम्पियन

पाटील इस्टेट परिसरात तुटलेल्या चेंबरमुळे नागरिकांचा जीव धोक्यात; मनसेचा महापालिकेला दोन दिवसांचा अल्टिमेटम
2

पाटील इस्टेट परिसरात तुटलेल्या चेंबरमुळे नागरिकांचा जीव धोक्यात; मनसेचा महापालिकेला दोन दिवसांचा अल्टिमेटम

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?
3

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

Chess: बुद्धिबळाच्या पटावर सुयोग वाघने केले प्रतिस्पर्ध्याला केले चेकमेट! पटकावले विजेतेपद
4

Chess: बुद्धिबळाच्या पटावर सुयोग वाघने केले प्रतिस्पर्ध्याला केले चेकमेट! पटकावले विजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.