Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Football: यजमान लोयोलाचा दुहेरी पराभव! सेंट व्हिन्सेंट्स अन् ‘हे’ संघ ठरले फुटबॉलचे नवे चॅम्पियन

Football: यू-१६ गटाच्या अंतिम सामन्यात जेएन पेटिट टेक्निकल स्कूलने यजमान लोयोला हायस्कूलचा २-० असा पराभव केला. जेएन पेटिटच्या रुग्वेद घुलेने २८व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2026 | 04:21 PM
बिशप्स कॅम्पचा यू-१२ मध्ये पिछाडीवरून विजय

बिशप्स कॅम्पचा यू-१२ मध्ये पिछाडीवरून विजय

Follow Us
Follow Us:
  • लोयोला फुटबॉल कपवर बिशप्स कॅम्प, सेंट व्हिन्सेंट्स, जेएन पेटिटचे वर्चस्व
  • बिशप्स कॅम्पचा यू–१२ मध्ये पिछाडीवरून विजय
  • यू–१४ मध्ये सेंट व्हिन्सेंट्स, तर यू–१६ मध्ये जेएन पेटिटकडून यजमान लोयोलाचा पराभव
पुणे/Football: बिशप्स स्कूल, कॅम्प, सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल आणि जेएन पेटिट टेक्निकल स्कूल यांनी आपापल्या वयोगटांत विजेतेपद पटकावत लोयोला फुटबॉल कप २०२६ स्पर्धेची सांगता केली. पाषाण येथील लोयोला हायस्कूलच्या (Sports) मैदानावर रविवारी झालेल्या तीनही अंतिम लढती चुरशीच्या ठरल्या. लोयोला स्कूल आणि एक्स-लोयोला अल्युम्नी नेटवर्क (ELAN) यांच्या संयुक्त विद्यमाने, टाटा ऑटोकॉम्पच्या प्रायोजकत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बिशप्स कॅम्पने यू-१२ गटाच्या अंतिम सामन्यात पिछाडीवरून खेळ करत विद्या व्हॅली स्कूलचा २-१ असा पराभव केला. यू-१४ गटात सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलने यजमान लोयोला हायस्कूलवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवला, तर यू-१६ गटात जेएन पेटिट टेक्निकल स्कूलने लोयोलाला २-० असे नमवून विजेतेपदावर नाव कोरले.

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

यू-१२ मध्ये बिशप्स कॅम्पचा दमदार पुनरागमन विजय

यू-१२ गटाच्या अंतिम सामन्यात विद्या व्हॅली स्कूलने सुरुवातीला आघाडी घेतली. आदित्य द्विवेदीने १९व्या मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, बिशप्स कॅम्पने हार न मानता जोरदार पुनरागमन केले. २६व्या मिनिटाला प्राणव मेननने पेनल्टीवर गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर एहान पठाणने ३१व्या मिनिटाला निर्णायक गोल नोंदवत बिशप्स कॅम्पला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळेत ही आघाडी कायम राखत बिशप्स कॅम्पने यू-१२ गटाचे विजेतेपद पटकावले.

रेयानच्या दोन गोलमुळे सेंट व्हिन्सेंट्स विजयी

यू-१४ गटाच्या अंतिम सामन्यात सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलने यजमान लोयोला हायस्कूलचा ३-० असा पराभव करत विजेतेपद मिळवले. रेयान पंजाबीने १४व्या मिनिटाला गोल करून सेंट व्हिन्सेंट्सला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अर्जुन सावंतने २०व्या मिनिटाला गोल करत आघाडी २-० अशी केली. सामन्याच्या ४६व्या मिनिटाला रेयानने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

यू-१६ मध्ये जेएन पेटिटकडून लोयोलाला धक्का

यू-१६ गटाच्या अंतिम सामन्यात जेएन पेटिट टेक्निकल स्कूलने यजमान लोयोला हायस्कूलचा २-० असा पराभव केला. जेएन पेटिटच्या रुग्वेद घुलेने २८व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी लोयोलाने प्रयत्न केले; मात्र जेएन पेटिटच्या बचावफळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. ५१व्या मिनिटाला युग चौहानने दुसरा गोल नोंदवत जेएन पेटिटची आघाडी २-० अशी केली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत जेएन पेटिटने यू-१६ गटाचे विजेतेपद पटकावले.

यजमान लोयोला हायस्कूलला यू-१४ आणि यू-१६ या दोन्ही गटांत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी टाटा ऑटोकॉम्पचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद गोयल यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी टाटा ऑटोकॉम्पचे महाव्यवस्थापक कौस्तुभ म्हाडगुत, लोयोला हायस्कूलचे प्राचार्य फादर नेल्टन, सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलचे प्राचार्य फादर टायटस, सेंट व्हिन्सेंट्स कॉलेजचे संचालक फादर अनिश, ELANचे अध्यक्ष नितीन जोशी, उपाध्यक्ष हरजीत माथारू, सचिव रोहित नाईक, खजिनदार प्रतीक जवळे आणि समिती सदस्य मनोज वालवेकर उपस्थित होते.

Loyola Football Cup 2026 मध्ये गोल्सचा धडाका अन्…; ‘या’ चार संघांचा दणदणीत विजय

निकाल – अंतिम सामने

यू-१२ : बिशप्स स्कूल, कॅम्प २ (प्राणव मेनन २६वे मिनिट, पेनल्टी; एहान पठाण ३१वे मिनिट) वि. विद्या व्हॅली स्कूल १ (आदित्य द्विवेदी १९वे मिनिट).

यू-१४ : सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल ३ (रेयान पंजाबी १४वे, ४६वे मिनिट; अर्जुन सावंत २०वे मिनिट) वि. लोयोला हायस्कूल ०.

यू-१६ : जेएन पेटिट टेक्निकल स्कूल २ (रुग्वेद घुले २८वे मिनिट; युग चौहान ५१वे मिनिट) वि. लोयोला हायस्कूल

Web Title: Pune loyola football tournament 2026 bishops camp st and vincent win trophy tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Football Tournament
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Virendra Sehwag Birthday: गोलंदाजांची झोप उडवणारा स्फोटक फलंदाज! सेहवागच्या नावावर अनोखा विश्वविक्रम
1

Virendra Sehwag Birthday: गोलंदाजांची झोप उडवणारा स्फोटक फलंदाज! सेहवागच्या नावावर अनोखा विश्वविक्रम

पाटील इस्टेट परिसरात तुटलेल्या चेंबरमुळे नागरिकांचा जीव धोक्यात; मनसेचा महापालिकेला दोन दिवसांचा अल्टिमेटम
2

पाटील इस्टेट परिसरात तुटलेल्या चेंबरमुळे नागरिकांचा जीव धोक्यात; मनसेचा महापालिकेला दोन दिवसांचा अल्टिमेटम

Asian Para Games 2026: दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, ४०० मीटरमध्ये बनवला रेकॉर्ड
3

Asian Para Games 2026: दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, ४०० मीटरमध्ये बनवला रेकॉर्ड

Cristiano Ronaldo: रोनाल्डोच्या करिअरला लागला ब्रेक? पोर्तुगालने किती दिवसांसाठी केले निलंबित, ‘या’ कारणामुळे शिक्षा
4

Cristiano Ronaldo: रोनाल्डोच्या करिअरला लागला ब्रेक? पोर्तुगालने किती दिवसांसाठी केले निलंबित, ‘या’ कारणामुळे शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.