Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

बारामती निवडणुकीतून काँग्रेसने अर्ज माघारी घेतला आहे. परंतु कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 11, 2026 | 05:00 PM
काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण...; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण...; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Follow Us
Follow Us:

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेमुळे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ॲड आकाश विजयराव मोरे यांचा दाखल केलेला अर्ज अखेर मागे घेण्यात आला. मात्र २३ उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामती निवडणुकीतून काँग्रेसने अर्ज माघारी घेतला आहे. परंतु कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

 

बारामती पोटनिवडणुकीच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सर्वांच्या विनंतीचा विचार करून अजित पवारांसाठी सहानुभूती म्हणून अर्ज माघारी घेतला आहे. परंतु कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, असे असले तरी काँग्रेस पक्षाची भूमिका कायम आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा गुन्हा दाखल करावा यासाठी काँग्रेस पक्ष आजही आग्रही आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल केला नाही मात्र काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात गुन्हा दाखल केलेला आहे व त्याचा पाठपुरावा काँग्रेस करत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून लक्ष घालण्याची विनंती केली, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे आमदार रोहित पवार तातडीने बंगळुरूला गेले, त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी भेट घेऊन पाठपुरावा करण्याची विनंती केली. तसेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशीही अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी आम्ही चर्चा केली पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या एनसीपी पक्षातील मंत्री व नेते यावर काहीच बोलत नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सत्यशोधक चळवळीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे येथील महात्मा फुले वाड्याला भेट देवून अभिवादन केले. यावेळी सपकाळ म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, त्यांनी घालून दिलेली सामाजिक न्यायाची सांगड आजही अत्यंत महत्वाची आहे. महात्मा ज्योतीबा फुलेंचा विचार पुढे घेऊन जायची गरज आहे व काँग्रेस पक्ष त्याचा विचारातून वाटचाल करत आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Harshvardhan sapkal has made a clear statement on the baramati assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • baramati
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न, भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी हवी’; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
1

‘संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न, भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी हवी’; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
2

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा
3

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

‘MPSC भरती घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा’; हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप, ऑनलाइन परीक्षा रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
4

‘MPSC भरती घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा’; हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप, ऑनलाइन परीक्षा रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.