Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न, भाजपला वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी हवी’; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर लोकशाही, संविधान आणि विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याचा आरोप करत जोरदार टीका केली.

  • By विवेक
Updated On: Jul 12, 2026 | 08:14 PM
‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Follow Us
Follow Us:
  • हर्षवर्धन सपकाळांचा आरोप – भाजपचा अजेंडा ‘वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी’ असून लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • महात्मा फुले यांच्या विचारांचा राज्यभर प्रचार करण्यासाठी काँग्रेस वर्षभर जनजागृती अभियान राबवणार.
  • बोगस बियाणे, पेपरफुटी आणि विविध घोटाळ्यांवर सरकारवर टीका करत कठोर कारवाईची मागणी.
 

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आयोजित बहुजन कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. भाजप संविधानाची पायमल्ली करत ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी बोलताना त्यांनी “भाजपचा खरा अजेंडा ‘वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी’ असून देशात एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा गंभीर आरोप केला.

‘सरकारने बाभळी पेरली अन् जनतेला आंब्याची स्वप्ने दाखवली’; समृद्धी महामार्गावरून रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

महात्मा फुले यांच्या विचारांचा राज्यभर प्रचार करणार

सपकाळ म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण, समता, सत्यशोधन आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांसह सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा राज्यभर प्रचार करण्यासाठी काँग्रेस वर्षभर जनजागृती अभियान राबवणार आहे.

गावागावांत व्याख्याने, परिसंवाद, विद्यार्थी मेळावे आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचा प्रचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या अधिकारांवर संकट निर्माण झाल्याचा आरोप केला. शेतकरी, बेरोजगारी आणि महागाईसारख्या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेस कार्यसमिती सदस्य चंद्रकांत हंडोरे यांनी जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर टीका करत समतावादी विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले.

‘लोक नगरसेवकपदासाठी लोटांगण घालतात, मी राज्यसभेला ठोकर मारली, दुसऱ्यांच्या दारी गेले नाही’; नवनीत राणांचा टोला

बोगस बियाण्यांच्या प्रश्नावर सरकारला लक्ष्य

माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील बोगस बियाणे, पेपरफुटी, बोगस पदव्या आणि नोकरी घोटाळ्यांवर सरकारवर टीका केली. बोगस बियाण्यांचे रॅकेट सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच अभिनेता आमिर खान यांच्याविषयी भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, हिंदुत्वाचे स्वयंघोषित ठेकेदारांनी इतरांना सल्ले देण्यापूर्वी राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रश्नांवर उत्तर द्यावे, असेही सपकाळ म्हणाले.

Web Title: Harshvardhan sapkal slams bjp one nation one political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘जरांगे पाटलांचं आंदोलन फक्त स्वार्थासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी..,’ मनोज जरांगे पाटलांवर भाजप आमदाराचा घणाघात
1

‘जरांगे पाटलांचं आंदोलन फक्त स्वार्थासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी..,’ मनोज जरांगे पाटलांवर भाजप आमदाराचा घणाघात

NDA की इंडिया? आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणाची सत्ता येणार? सर्व्हेत आकडे समोर, महाराष्ट्रात कोणाला किती जागा?
2

NDA की इंडिया? आज लोकसभा निवडणूक झाली तर कोणाची सत्ता येणार? सर्व्हेत आकडे समोर, महाराष्ट्रात कोणाला किती जागा?

भाजपला मोठा धक्का? भाजप मंत्र्याच्या भावाचा होणार शिंदे गटात पक्षप्रवेश
3

भाजपला मोठा धक्का? भाजप मंत्र्याच्या भावाचा होणार शिंदे गटात पक्षप्रवेश

‘… तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर देऊ’; भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले
4

‘… तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर देऊ’; भाजप नेत्याचा मनसेला इशारा! रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.