Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: प्रसादाच्या पिशवीत आता ‘घरगुती मोदक’; पुण्याच्या पेठा ठरल्या छोट्या विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ

Ganeshotsav 2026: घरच्या घरी मोदक तयार करून विक्री करणाऱ्या महिला आणि कुटुंबांनी गणेशोत्सवासाठी विशेष तयारी केली आहे. सकाळपासून मोदक तयार करणे, त्यांची पॅकिंग करणे आणि मंडळांच्या परिसरात विक्रीसाठी आणणे, असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 24, 2026 | 04:37 PM
pune ganeshotsav 2026

pune ganeshotsav 2026

Follow Us
Follow Us:
  • मोदकांच्या गोडव्याने छोट्या व्यवसायाला बळ
  • मंडळांबाहेर घरगुती मोदकांचे स्टॉल
  • भाविकांची प्रसादासाठी आवर्जून खरेदी
Pune Ganeshotsav 2026: गणरायाच्या दर्शनासाठी पेठांमध्ये येणाऱ्या भाविकांच्या हातात यंदा केवळ प्रसादाची पिशवी नाही, तर घरगुती मोदकही दिसत आहे. शनिवार, सदाशिव, नारायण, शुक्रवार, बुधवार, कसबा, सोमवार अशा पेठांमध्ये विविध गणेश मंडळांच्या परिसरात घरगुती पद्धतीने तयार केलेले उकडीचे, तळणीचे तसेच विविध चवींचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मंडळाच्या बाहेर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी हीच या छोट्या विक्रेत्यांसाठी ग्राहकांची मोठी बाजारपेठ ठरत आहे.

घरच्या घरी मोदक तयार करून विक्री करणाऱ्या महिला आणि कुटुंबांनी गणेशोत्सवासाठी विशेष तयारी केली आहे. सकाळपासून मोदक तयार करणे, त्यांची पॅकिंग करणे आणि मंडळांच्या परिसरात विक्रीसाठी आणणे, असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. अनेक ठिकाणी भाविक दर्शनानंतर प्रसादासाठी मोदक खरेदी करत आहेत. त्यामुळे मोठ्या दुकानांबरोबरच घरगुती विक्रेत्यांच्या हातालाही या दहा दिवसांत चांगले काम मिळत आहे.

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

विशेष म्हणजे, मंडळांच्या परिसरात भाविकांची सतत वर्दळ असल्याने ग्राहक शोधण्यासाठी स्वतंत्र जाहिरातीची गरज या विक्रेत्यांना भासत नाही. ‘दर्शनासाठी आलेला भाविक आणि प्रसादासाठी मोदक’ हे गणेशोत्सवातील समीकरण त्यांच्या व्यवसायाला हातभार लावत आहे. काही विक्रेते सकाळच्या गर्दीपूर्वीच मोदक तयार करून आणत असून, मागणी वाढल्यास दिवसभरात पुन्हा मोदक बनविले जात आहेत.

यंदा कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे मोदकांच्या किमतीत वाढ झाली असली तरी मागणीवर त्याचा मोठा परिणाम झालेला नाही. पुण्यात यंदा उकडीच्या मोदकाचा दर साधारण ३० ते ५० रुपये प्रतिनग आहे.  त्यामुळे दहा, वीस किंवा त्यापेक्षा अधिक मोदकांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे छोट्या विक्रेत्यांच्या रोजच्या उलाढालीला चालना मिळत आहे.

‘घरच्या चवीचा मोदक’ हीच या विक्रीची खासियत ठरत आहे. आजी-आईकडून शिकलेली पाककृती, ताजे साहित्य आणि मागणीनुसार तयार केलेले मोदक यामुळे भाविकही मंडळाबाहेरील या छोट्या विक्रेत्यांकडून आवर्जून खरेदी करत आहेत. परिणामी, बाप्पाच्या उत्सवात प्रसादाचा मोदक अनेक कुटुंबांसाठी उत्पन्नाचे दहा दिवसांचे साधन ठरत आहे.

गणपतीच्या दिवसांत मंडळाच्या परिसरात ग्राहक सहज मिळतात. घरातूनच मोदक तयार करून आणतो. दर्शनासाठी आलेले भाविक प्रसादासाठी मोदक घेत असल्याने या काही दिवसांत नेहमीपेक्षा चांगली विक्री होते.
— संजय जाधव, घरगुती मोदक विक्रेता

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त

मोदकांचे दर

मोदकाचा प्रकार. साधारण दर (प्रति नग)
उकडीचा मोदक. ₹३०–५०
तळणीचा मोदक. ₹२०–३०
मावा मोदक. ₹२५–४०
चॉकलेट मोदक. ₹२५–४०
ड्रायफ्रूट मोदक. ₹४०–७०
केशर मोदक. ₹३०–५०
पिस्ता मोदक. ₹३०–५०
गुलकंद मोदक. ₹२५–४०

Web Title: Home made modak get local market in petha area in pune ganeshotsav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Business
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Pune Ganeshotsav: पुण्यात PMPML चे बस मार्ग बदलले; ‘ही’ ५ बसस्थानके तात्पुरती स्थलांतरित
1

Pune Ganeshotsav: पुण्यात PMPML चे बस मार्ग बदलले; ‘ही’ ५ बसस्थानके तात्पुरती स्थलांतरित

Ganeshotsav: ‘वक्रतुंड’ ते ‘माता महाकाली’! रथ, पालख्या अन्…; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज
2

Ganeshotsav: ‘वक्रतुंड’ ते ‘माता महाकाली’! रथ, पालख्या अन्…; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात ढोल-ताशा वाजविण्याची परंपरा कशी झाली सुरु? १९६५ च्या विरोधाशी काय आहे संबंध

स्क्रीन टाइम घटवा, ड्रीम टाइम वाढवा! मेहुणपुरा मंडळाचा तरुणाईला डिजिटलायझेशनच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा संदेश
4

स्क्रीन टाइम घटवा, ड्रीम टाइम वाढवा! मेहुणपुरा मंडळाचा तरुणाईला डिजिटलायझेशनच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.