पुणेकरांनी दिली मेट्रो प्रवासाला मोठी पसंती (फोटो- सोशल मिडिया)
शनिवारी मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. या एकाच दिवशी ४ लाख ७८ हजार ४७७ प्रवाशांनी प्रवास केला, ज्यातून ६० लाख २५ हजार २७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर रविवारी ३ लाख ९८ हजार ९०० नागरिकांनी मेट्रोचा वापर केला असून त्यातून ५१ लाख ४९ हजार २३७ रुपयांचा महसूल जमा झाला.
Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल
स्वारगेट-पिंपरी मार्गावर सर्वाधिक गर्दी
प्रवाशांची पहिली पसंती स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गाला राहिली. दोन दिवसांत एकट्या याच मार्गावर ४ लाख ९८ हजार ७६२ प्रवाशांनी प्रवास केला. गणेशोत्सवानिमित्त मध्यवर्ती पेठांमध्ये गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.
दुसरीकडे, वनाज ते रामवाडी या मार्गावर शनिवारी २ लाख ९ हजार ५३९, तर रविवारी १ लाख ६९ हजार ७६ प्रवाशांनी प्रवास केला. गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने फेऱ्यांची संख्या आणि सेवेची वेळ वाढवली आहे. वाहतूक कोंडी अन् पार्किंगच्या कटकटीपासून वाचण्यासाठी नागरिक खाजगी वाहनांऐवजी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पुण्यातील गर्दी वाढत असताना, उपनगरांतून शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचण्यासाठी पुणेकरांकडून मेट्रोला मोठी पसंती मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मेट्रोच्या प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत असून, अवघ्या चार दिवसांत दैनंदिन प्रवासीसंख्येत तब्बल १ लाख १० हजारांहून अधिक वाढ झाली आहे. याचा परिणाम मेट्रोच्या दैनंदिन महसुलावरही झाला आहे.





