Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: थरकाप उडणार! दुष्काळाचे संकट? कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह…

पुणे शहर आणि परिसरात सध्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मंगळवारी (ता.१४) शहरात किमान २२.७ अंश सेल्सिअस तर कमाल ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2026 | 06:55 PM
Maharashtra Rain Alert: थरकाप उडणार! दुष्काळाचे संकट? कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह...

Maharashtra Rain Alert: थरकाप उडणार! दुष्काळाचे संकट? कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह...

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम
  • पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज
  • पुढील चोवीस तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता
पुणे/सुनयना सोनवणे: गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसानंतर शहरात पावसाने पाठ फिरवली असून, वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांची नजर पुन्हा एकदा पावसाकडे लागली असतानाच, हवामान विभागाने पुढील पाच दिवस शहरात पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, उत्तर बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या दक्षिण बांगलादेश परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत नैऋत्य दिशेने झुकलेली वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, या प्रणालीच्या प्रभावाखाली पुढील चोवीस तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात पुणे शहरात आणि राज्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील पाणीसाठयात काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले. खडकवासला धरण देखील भरले असले तरी धरणसाखळीत मात्र अद्याप पुरेसा साठा जमा झालेला नाही. त्यामुळे पुण्यात एकदिवसाआड पाणीकपात करण्यात येणार आहे.

या हवामान प्रणालीचा परिणाम राज्यातील काही भागांवर होण्याची शक्यता आहे. बुधवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?

मात्र, पुणे शहर आणि परिसरात सध्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मंगळवारी (ता.१४) शहरात किमान २२.७ अंश सेल्सिअस तर कमाल ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिले असून, दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते.

Rain Update : 9 दिवसांतच पावसाचा हाहा:कार; जुलैच्या पावसाने भरली जूनमधील तूट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी (ता.१५) पुण्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर दुपारनंतर किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील पाच दिवस पुणे शहर आणि परिसरात पावसाची शक्यता नसल्याने उकाड्यापासून दिलासा मिळण्याची प्रतीक्षा पुणेकरांना करावी लागणार आहे.

Web Title: Imd gave no rain 5 days at pune and rain aler for kokan and middle maharashtra weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?
1

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?

Rain Update : 9 दिवसांतच पावसाचा हाहा:कार; जुलैच्या पावसाने भरली जूनमधील तूट
2

Rain Update : 9 दिवसांतच पावसाचा हाहा:कार; जुलैच्या पावसाने भरली जूनमधील तूट

Pune News: माऊलींसाठी ‘वरुणराजा’ची विश्रांती! वारकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; उद्यापासून तापमानात…
3

Pune News: माऊलींसाठी ‘वरुणराजा’ची विश्रांती! वारकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; उद्यापासून तापमानात…

Weather Forecast: IMD चा नवा अंदाज, आठवडाभराच्या धुमाकूळानंतर पाऊस विश्रांती घेणार; ‘या’ तारखेपर्यंत जोर ओसरणार
4

Weather Forecast: IMD चा नवा अंदाज, आठवडाभराच्या धुमाकूळानंतर पाऊस विश्रांती घेणार; ‘या’ तारखेपर्यंत जोर ओसरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.