Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?

मंगळवारी रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्याचवेळी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पाणी आल्याने काही भागांतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2026 | 07:00 PM
Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे 'रौद्ररूप'; तर पुणे शहरात..., हवामान विभागाचा अलर्ट काय?

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे 'रौद्ररूप'; तर पुणे शहरात..., हवामान विभागाचा अलर्ट काय?

Follow Us
Follow Us:

द्रोणीय रेषेच्या प्रभावामुळे राज्यातील पावसाचा जोर कायम
चोवीस तासांत राज्यात जोरदार पावसाची नोंद
पुणे शहरातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता

सुनयना सोनवणे/पुणे: दक्षिण गुजरातपासून मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत सक्रिय झालेल्या ऑफ शोअर ट्रफ म्हणजेच द्रोणीय रेषेच्या प्रभावामुळे राज्यातील पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची नोंद झाली. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला, तर घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.

पुणे शहरात बुधवारी ( ता.८) कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्याचवेळी खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पाणी आल्याने काही भागांतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (दि. ९) पुणे शहरातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. शहरात कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आकाश पूर्णतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणेकरांवर भीषण संकट! Khadakwasla धरणातून मुठा नदीत तब्बल ‘इतक्या’ हजार…; पावसाचा जोर कायम

दरम्यान, शुक्रवारपासून पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता असून तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे घाट परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पावसाची नोंद (मिमी मध्ये)

– लवळे : ५९ मिमी
– गिरिवन : ३९ मिमी
– भोर : २६ मिमी
– माळीण : १६.५ मिमी
– पाषाण : १६.२ मिमी
– शिवाजीनगर : १५.१ मिमी
– निमगिरी : ११.५ मिमी

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

– चिंचवड : ९.५ मिमी
– दापोडी : ६.५ मिमी
– राजगुरुनगर : ५ मिमी
– दौंड : ४ मिमी
– हडपसर : ३ मिमी
– शिरूर : ३ मिमी
– दुदुळगाव : २.५ मिमी
– बारामती : १.८ मिमी

Web Title: Imd gave orange alert to ghatmatha rain flow down in pune latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • maharashtra rain news
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
1

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…
2

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट
3

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.