
आरोग्य सांभाळण्याचे डॉक्टरांचे आवाहन
दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्यामुळे थेट उन्हाचा चटका नागरिकांना सहन करावा लागला. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक जाणवत होती. हालांकि, सायंकाळच्या सुमारास काही काळ अंशतः ढगाळ हवामान निर्माण झाले होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी (६ ऑक्टोबर) शहरातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच दुपारनंतर किंवा सायंकाळच्या वेळी काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते.
राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…
तापमानातील या अचानक बदलाचा आणि वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा अशा विषम हवामानामुळे सर्दी, खोकला, घशाचे संसर्ग आणि तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील खासगी दवाखाने, क्लिनिक्स तसेच शासकीय रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
डॉक्टरांचा काळजी घेण्याचा सल्ला
भरपूर पाणी प्या: शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी, लिंबू सरबत, ताक किंवा नारळपाणी घ्यावे.
आहारावर नियंत्रण: पचनास हलका आणि ताजा आहार घ्यावा. तेलकट व उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
उन्हात बाहेर पडणे टाळा: अतिउन्हाच्या वेळेत (दुपारी १२ ते ४) अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर पडणे गरजेचे असल्यास सुती कपडे वापरावेत आणि डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट