Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

उत्तर गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवेचा दाब सरासरीपेक्षा वाढला आहे. त्यात निरभ्र आकाशामुळे दिवसभर सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत असून, उष्ण व कोरडे वारेही तापमानवाढीस हातभार लावत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 10, 2026 | 09:30 AM
राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा

Follow Us
Follow Us:
  • राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला
  • विदर्भात पारा 39 अंशांवर; रात्रीचाही उकाडा वाढणार
  • अलिबागमध्ये किमान तापमान २७.६ अंशांवर
मुंबई : मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेताच राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच अनेक भागांतील कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ७ अंश सेल्सिअसने वाढले असून, मुंबई-सांताक्रूझ आणि रत्नागिरीत उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती जाणवली. निरभ्र आकाश, वाढलेला हवेचा दाब आणि उत्तर भारतातून वाहणारे उष्ण व कोरडे वारे यामुळे दुपारची उष्णता अधिक तीव्र झाली आहे.

मुंबईत समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहावरही हावरही परिणाम होत असल्याने उकाड्याची तीव्रता जाणवत आहे. मात्र, 20 ऑक्टोबरपासून कमाल तापमानात घट होऊन काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. उत्तर गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवेचा दाब सरासरीपेक्षा वाढला आहे. त्यात निरभ्र आकाशामुळे दिवसभर सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत असून, उष्ण व कोरडे वारेही तापमानवाढीस हातभार लावत आहेत.

Navi Mumbai Traffic : कोपरखैरणेकर वाहतूककोंडीने हैराण ! भुयारी मार्गात टेम्पो अडकतात, वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

दरम्यान, मुंबईत समुद्राकडून येणारे थंड वारे संथ झाल्यास जमिनीवरील उष्णता कमी होण्यास विलंब होतो. त्यामुळे सकाळचा आल्हाददायकपणा कमी होऊन दुपारनंतर उकाडा अधिक जाणवतो. पुढील दोन आठवड्यांत चक्रीवादळ किंवा महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याचे खुळे यांनी म्हटले आहे. दसऱ्यापासून, म्हणजे २० ऑक्टोबरपासून, तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.

विदर्भात पारा 39 अंशांवर; रात्रीचाही उकाडा वाढणार

खुळे यांच्या निरीक्षणानुसार, कोकणात कमाल तापमान ३३ ते ३८ अंश, मध्य महाराष्ट्रात ३४ ते ३८ अंश, मराठवाड्यात ३४ ते ३६.६ अंश, तर विदर्भात ३५ ते ३९ अंशांपर्यंत पोहोचले आहे. या भागांतील तापमान सरासरीपेक्षा लक्षणीय अधिक आहे. तुलनेने पहाटेच्या किमान तापमानात मोठी वाढ झालेली नसली, तरी अलिबागमध्ये किमान तापमान २७.६ अंश नोंदवण्यात आले. १६ ते २२ ऑक्टोबरदरम्यान रात्रीचाही उकाडा वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Web Title: Citizens across maharashtra are feeling the brunt of the october heat nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Weather
  • Mumbai News
  • Sun heat
  • Weather Update

संबंधित बातम्या

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी
1

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी

Mumbai News : ‘देवसखा’मधून रंगणार भक्ती आणि देवाच्या नात्याचा सुरेल प्रवास, भक्ती, श्रद्धा, संगीताचा संगम
2

Mumbai News : ‘देवसखा’मधून रंगणार भक्ती आणि देवाच्या नात्याचा सुरेल प्रवास, भक्ती, श्रद्धा, संगीताचा संगम

केंद्राकडून राज्यातील दुष्काळाचा आढावा; परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथक महाराष्ट्रात
3

केंद्राकडून राज्यातील दुष्काळाचा आढावा; परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथक महाराष्ट्रात

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका
4

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.