Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संशयाचे भूत डोक्यात शिरले अन् ७४ वर्षांच्या वृद्धाचा काटा काढला; इंदापूरमधील अंगावर काटा आणणारी घटना

स्मशानभूमीत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याचा मारेकऱ्यांचा समज होता, पण सरणावर वापरलेल्या लाकडाने आणि रक्ताच्या एका डागाने पोलिसांना थेट आरोपींच्या दारापर्यंत पोहोचवले. पुणे ग्रामीण आणि वालचंदनगर पोलिसांनी केलेल्या या थरारक तपासाने एका गूढ खुनाचा छडा लावला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 22, 2026 | 04:13 PM
image

image

Follow Us
Follow Us:
  • स्मशानभूमीत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याचा संशय.
  • ७४ वर्षीय वृद्ध आपल्या पत्नीकडे वाईट नजरेने बघत असल्याच्या संशयातून खून.
  • पुणे ग्रामीण आणि वालचंदनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दोन्ही संशयित अटक.

पुणे: गुन्हेगार कितीही सराईतपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करोत, पण पोलिसांचा खाकी खडा आणि वैज्ञानिक तपास पद्धती आरोपींना त्यांच्या लॉजिकच्या आधारे बेड्या ठोकतच असते. पुणे ग्रामीण पोलीस आणि वालचंदनगर पोलिसांनी एका अत्यंत गूढ, थरारक आणि थरकाप उडवणाऱ्या हत्या प्रकरणाचा असाच एका छोट्या पुराव्याच्या आधारे पर्दाफाश केला आहे. स्मशानभूमीत मृतदेह पूर्णपणे जाळून सर्व पुरावे नष्ट केल्याचा मारेकऱ्यांचा गैरसमज होता. मात्र, सरणावर वापरलेले लाकूड आणि जमिनीवरील रक्ताचा एक डाग पोलिसांसाठी धागा ठरला आणि त्यांनी थेट मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेने पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी काय होती घटना? इंदापूर तालुक्यातील थरार

इंदापूर तालुक्यातील तावशी गावाच्या स्मशानभूमीत १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी काहीतरी संशयास्पद जळत असल्याची माहिती तिथल्या पोलीस पाटलांनी वालचंदनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस जेव्हा स्मशानभूमीत पोहोचले, तेव्हा तिथे लोखंडी जाळीवर केवळ जळालेली हाडे, राख आणि निखारे पडलेले होते. मृतदेह इतक्या निर्दयीपणे जाळण्यात आला होता की, मृताची प्राथमिक ओळख पटवणे देखील अशक्यप्राय झाले होते. मात्र, तपासादरम्यान पोलिसांच्या सूक्ष्म नजरेने एक महत्त्वाची बाब टिपली. मृतदेह जाळलेल्या सरणापासून साधारण चाळीस फुटांवर जमिनीवर आणि काही जळालेल्या लाकडांवर रक्ताचे लहान डाग व शिंतोडे आढळले. या पुराव्यावरून हा कोणताही साधा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू नसून, कुणीतरी अत्यंत क्रूरपणे खून करून तो लपवण्यासाठी मृतदेह जाळल्याचा दाट संशय पोलिसांच्या मनात बळावला.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime: सुरुवातीला वाटला अपघात, पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा देह पाहून उडाली खळबळ!

वखारीपासून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा थरारक प्रवास

मृताची कोणतीही ओळख पटत नसताना पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांना राखेची पाहणी करताना मृताच्या दातांवरील कॅप (Dental Cap) आणि काही चाव्या मिळाल्या, पण मूळ व्यक्ती कोण हा मोठा प्रश्न होता. अशातच पोलिसांनी एक भन्नाट आणि अत्यंत तांत्रिक युक्ती वापरली. पोलिसांनी शोध घेण्याचे ठरवले की, या सरणात वापरलेले लाकूड नेमके आणले कुठून? पोलिसांनी इंदापूर, माळशिरस आणि फलटण परिसरातील प्रत्येक वखारीत (Timber Market) कसून चौकशी सुरू केली. तांत्रिक तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली. सरणासाठी वापरलेली ती लाकडे फलटण तालुक्यातील गुणवरे येथील एका वखारीतून दोन तरुणांनी अंत्यविधीसाठी म्हणून खरेदी केली होती आणि ती एका वाहनातून नेली होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने सूत्रे हलवली आणि ३० वर्षीय व २३ वर्षीय अशा दोन्ही संशयित तरुणांना ताब्यात घेतले.

संशयाचा किडा आणि खुनाचा भयानक कट

सुरुवातीला पोलिसांनी चौकशी केली असता दोन्ही तरुणांनी टाळाटाळ केली आणि उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांने आपला खाक्या दाखवताच दोघांचेही धाबे दणाणले. त्यांनी पोलिसी खाक्यासमोर हत्येची संपूर्ण कबुली दिली. चौकशीत मृत व्यक्ती परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील ७४ वर्षीय वृद्ध असल्याचे निष्पन्न झाले. मुख्य आरोपी ३० वर्षीय तरुणाच्या मनात एक संशय घर करून बसला होता; तो वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत आहे आणि तिच्यावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. याच संशयापोटी आणि रागाच्या भरात त्याने आपल्या २३ वर्षीय मित्राच्या मदतीने त्या वृद्ध व्यक्तीचा काटा काढण्याचा अत्यंत भयानक कट रचला.

सतोबाच्या यात्रेत नेण्याच्या बहाण्याने घातला बळी

कट रचल्यानंतर आरोपींनी वृद्धाला विश्वासात घेतले. सतोबाच्या यात्रेत जेवणासाठी नेण्याच्या बहाण्याने त्या ७४ वर्षीय वृद्धाला तावशीच्या स्मशानभूमीजवळ वाहनातून आणले. तिथे आल्यावर लघुशंकेच्या (Urination) बहाण्याने वाहन थांबवण्यात आले. वृद्ध खाली उतरताच आरोपींनी संधी साधली आणि पाठीमागून डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार वार केले. या प्राणघातक हल्ल्यात वृद्ध जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. गुन्हा लपवण्यासाठी आणि कुणालाही संशय येऊ नये म्हणून दोन्ही नराधमांनी मृतदेह तावशीच्या स्मशानभूमीत नेला, तिथे सरण रचून तो पूर्णपणे जाळून टाकला. मृतदेह राख झाल्यामुळे कोणीही शोधू शकणार नाही असा त्यांचा समज होता, परंतु पोलिसांची हुशारी आणि तांत्रिक तपासामुळे हा सर्व प्रकार उजेडात आला. पुणे ग्रामीण पोलीस आणि वालचंदनगर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे एका अंधाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून, दोन्ही आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.

Web Title: Indapur tavshi crematorium murder mystery solved pune police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Murder News
  • pune murder news
  • Pune Police News

संबंधित बातम्या

चहाविक्रेत्या दाम्पत्याचा अंत अन् अडीच वर्षांची चिमुकली गूढरीत्या गायब; या भयानक कृत्यामागचे रहस्य काय?
1

चहाविक्रेत्या दाम्पत्याचा अंत अन् अडीच वर्षांची चिमुकली गूढरीत्या गायब; या भयानक कृत्यामागचे रहस्य काय?

Chhatrapati Sambhajinagar Crime: सुरुवातीला वाटला अपघात, पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा देह पाहून उडाली खळबळ!
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: सुरुवातीला वाटला अपघात, पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा देह पाहून उडाली खळबळ!

Sanjay Gandhi National Park : रानडुकराच्या शिकारीत गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू लपवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र
3

Sanjay Gandhi National Park : रानडुकराच्या शिकारीत गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू लपवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र

वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार
4

वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.