Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Gandhi National Park : रानडुकराच्या शिकारीत गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू लपवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र

Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चेना बीट परिसरात रानडुकराच्या शिकारीसाठी गेलेल्या एका गटात झालेल्या गोळीबारात मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी विजय सुखरू सापटे यांचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती पोलिसांपासून लपवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप होत आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 21, 2026 | 06:26 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • मृतदेह विल्हेवाट लावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न  
  • डाॅक्टर राजेश पालांडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात सक्रीय  
  • वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल  
Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एका गटात  अंधाधुंद गोळीबार झाला. यामध्ये  विजय सुखरू सापटे (वय 60 वर्षे ) या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून सदर घटनेची माहिती पोलिसांपासून लपण्यात आली आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपींनी विजय सुखरू सापटे या  सफाई कर्मचाऱ्यांच्या मृतदेहावर पहाटेच अंतविधी केला.

एका खाजगी डॉक्टराकडून हृदयविकाराच्या झटक्याचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यात आले. काशीगाव पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला असून खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मृतदेह विल्हेवाट लावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (ठाणे येथील चेना बीट परिसर) जंगलामध्ये रानडुकराची शिकार करण्यासाठी गेलेल्या एका गटाकडुन चुकून गोळीबार झाला. यात मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे सफाई कामगार विजय सुखरू सापटे यांचा मृत्यू झाला. इतर दोनजण जखमी झाले आहेत. कुणाल शेलार आणि कल्पेश धंगाळा असे जखंमी झालेल्या व्यक्तींची नावे असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतदेह विल्हेवाट लावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि हत्येच्या कलमांनुसार कारवाई करत काही जणांना व एका डॉक्टरला अटक करण्यात आली.

गरब्याच्या मैदानात प्रेयसी दुसऱ्यासोबत दिसली; वादानंतर चिरागने उचललं टोकाचं पाऊल, मृत्यूनंतर रस्त्यावर आंदोलन

डाॅक्टर राजेश पालांडे शिवसेनेच्या शिंदे गटात सक्रीय

डॉ. राजेश पांलाडे यांनी विडिओ कॉल द्वारे मयताला बघून, विजय सुखरू सापटे यांचा मृत्यू घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद करणारे मृत्यू प्रमाणपत्र दिले. वास्तविक पांलाडे यांनी याबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे गरजेचे होते. पण तसे न करता मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ राजेश पांलाडे यांचे भाईंदरमध्ये आशिष मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल आहे. ते एक होमिओपॅथीमध्ये एम.डी. आहेत.

अटक झालेले डाॅक्टर राजेश पालांडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात सक्रीय असल्याचे सांगितले जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी त्याचे निकटचे संबंध आहेत. काही महिन्यापूर्वी डॅाक्टर असोसिएशनच्या अध्यपदी त्यांची  निवड झाली होती. या नियुक्तीचे प्रमाणपत्र स्वतःहा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देण्यात आले होते. असे सांगण्यात येत आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या गोळीबारात शस्त्राचा वापर कोणी केला, शस्त्र  कोणाचे होते, त्याचा परवाणा होता का ? या बाबत चौकशी करण्यात येत आहे. तसेच महेश गायकर , कातोड , बिस्तूर आणि लाभड अशी अटक  केलेल्यांची नावे समोर आली आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा- क्रमांक 01 आणि काशीगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे कोण? तीन आरोपी १० दिवस पोलीस कोठडीत; शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचाही तपास

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबाराच्या घटनेत कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: सफाई कर्मचारी विजय सुखरू सापटे यांचा

  • Que: डॉक्टरवर कोणता आरोप करण्यात आला आहे ?

    Ans: विजय सापटे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप

  • Que: पोलिसांचा तपास कोणत्या मुद्द्यांवर ?

    Ans: गोळीबार कोणी केला, वापरलेले शस्त्र कोणाचे होते, त्याचा परवाना होता का, तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला या बद्दल तपास सुरू आहे

Web Title: Sanjay gandhi national park firing case sanitation worker death sj1362296

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • mira bhaindar
  • Murder News
  • pratap sarnaik
  • Sanjay Gandhi National Park

संबंधित बातम्या

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रताप सरनाईकांसह तीन नेत्यांचं मोठं विधान; राजकारणात चर्चांना उधाण
1

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रताप सरनाईकांसह तीन नेत्यांचं मोठं विधान; राजकारणात चर्चांना उधाण

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये लोकशाही धोक्यात? आयुक्तांच्या निवासस्थानी घुसखोरीचा गंभीर आरोप!
2

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये लोकशाही धोक्यात? आयुक्तांच्या निवासस्थानी घुसखोरीचा गंभीर आरोप!

वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार
3

वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार

Pradeep Purnekar: ‘Next Target तू…’, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड, प्रताप सरनाईकांसमोर पुतणीचा धक्कादायक खुलासा
4

Pradeep Purnekar: ‘Next Target तू…’, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड, प्रताप सरनाईकांसमोर पुतणीचा धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.