
पुणे महानगरपालिकेसाठी आज पार पडले मतदान
महापालिकेवर पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज
दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला धक्का बसण्याची शक्यता
BJP VS NCP in Pune: राज्यात आज महानगरपालिकांसाठी मतदान पार पडले आहे. पुणे शहरात जवळपास 36 ते 37 टक्के मतदान झाल्याचे समजते आहे. उद्या 29 महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान पुणे महापालिकेवर कोणाची सत्ता येणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मतदान पार पडल्यावर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.
पुणे महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. प्रचार सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रचारात रंगत आणली. नागरिकांना आश्वासने दिली गेली. मात्र आज मतदान झालयावर एक्झिट पोलनुसार पुणे शहरात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येताना दिसत आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांना मोठा धक्का बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘जनमत’च्या एक्झिट पोलनुसार पुण्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर अजित पवार आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पुणे शहरात भाजपला 90 ते 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेनेला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
एक्झिट पोलनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला 43 जागा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवारांनी दिलेली फ्री मेट्रोची घोषणा फारशी काम करताना दिसून येत नाहीये. मात्र एक्झिट पोलचे हे आकडे केवळ अंदाज आहेत. खरे निकाल उद्याच जाहीर होणार आहेत.
ZP Election News: मार्कर पेनचा ‘खेळ’ खल्लास! आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काडीनेच शाई लागणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुंबईत ‘ठाकरी’ बाणा संपणार?
‘जनमत’च्या एक्झिट पोलनुसार मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता येताना दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसनेच्या मिळून 138 जागा निवडणून येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे व शरद पवार यांच्या यांच्या आघाडीला 62 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कॉँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 20 जागा मिळू शकतात. दरम्यान ही आकडेवारी एक्झिट पोलचे आकडे असून खरे आकडेवारी नाही. बहुमत कोणाच्या बाजूने येणार हे उद्याच्या निकालामधूनच स्पष्ट होणार आहे. आज राज्यात 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडले. काही ठिकाणी गोंधळात तर काही ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पर पडली. अनेक ठिकाणी इव्हीएम मशीन बंद पडणे, बोटावरची शाई पुसली जाणे असे प्रकार घडले.